
मदिनानगर भागात बेकायदेशीर वाळूचा पिकअप पकडला
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -संगमनेर शहरातील प्रवरा नदी पात्रातून बेकायदेशीर वाळूचा उपसा जोरात सुरू आहे.याचा प्रत्यय स्वतःआ अमोलखताळ यांना आला.ते स्वतःजमजम कॉलनीतील एका कार्यक्रमावरून घरी येत असताना त्यांना रस्त्यात वाळूची पिकअप आढळून आली. स्वत:आ खताळ यांनी पिकअप जागेवर थांबवत महसूल आणि पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार संगमनेर शहर पोलिसात ५ वाळू तस्करांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
संगमनेर शहरातील जमजम कॉलनीत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आ. अमोल खताळ गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते घरी येत असताना जमजम कॉलनीत त्यांना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वाळूने भरलेली पिकप येताना निदर्शनास आला. त्यांनी त्या पिकअप चालकाला थांबवले आणि त्याच ठिकाणावरून महसूल आणि पोलीस प्रशासनाला फोन करून लगेच कायदेशीर कारवाई करा असे निर्देश दिले. त्यानंतर पोलीस आणि महसूल पथकाची एकच तारांबळ उडाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन २ लाख रुपये किमतीची पिकअप आणि अर्धा ब्रास वाळूसह पिकअप ताब्यात घेतली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाळूने भरलेली पिकप ताब्यात घेतली. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पो हे कॉ हरिदास बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप मधील ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजहर रमजान शहा वय-२२ वर्षे रा. कुरण रोड संगमनेर , विकास पोपट गि-हे वय-२० आणि गिरिष सुरेश बर्डे वय-२४रा .राजु गणपत गु-हे वय १९ वर्षे रा.नान्नज पारेगाव ता. संग मनेर व मोमीन पेंटर गाव नाव माहित नाही असे गुन्हा दाखल झाले ल्यांची नावे आहेत
संगमनेर तालुक्यात प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे या वाळू उपसाकडे महसूल व पोलीस प्रशासनाचे अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे वाळू तस्करी बंद असल्याचे महसूलआणि पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.मात्र चक्क आ अमोल खताळ यांनीच वाळूने भरलेला पिकप पोलिसांना पकडून दिला त्यामुळे अधिकाऱ्यांचे वाळू तस्करी बंद असल्याचे म्हणणे फोल ठरले आता तरी महसूल व पोलीस प्रशासन वाळू तस्करीवर कारवाई करण्यासाठी ठोस पावले उचलतील का? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.