खाजगी विद्यापीठासंदर्भातील विधेयकामुळे गरीब विद्यार्थ्यांची दारे होणार बंद
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – राज्य शासनाने महाराष्ट्र विधिमंडळात 18 डिसेंबर रोजी पारित केलेल्या खाजगी विद्यापीठासंदर्भातील विधेयकामुळे गरीब विद्यार्थ्यांची दारे बंद होणार आहे. या नव्या विद्यापीठाच्या महाविद्यालयात शिकणारे कोणतेही गरीब विद्यार्थी या पुढे फ्रिशिप किंवा स्कॉलरशिप सारख्या सवलतीपासून वंचित राहणार आहे. ज्यांच्याकडे पैसा त्यानाच शिक्षणाची संधी भेटेल. ज्यांच्याकडे पैसा नाही त्या विद्यार्थ्यांना कितीही गुणवत्ता असली तरी त्यांना खाजगी विद्यापीठात प्रवेश मिळणार नाही. विद्यपीठात प्रवेश घेता येणार नाही. यामुळे गरीब विद्यार्थी शिक्षणच्या प्रवाहातून बाहेर पडणार आहे. त्याच्या शिक्षणावर गदा येणार आहे. या अधिनियमान्वये स्थापन केलेले प्रत्येक विद्यापीठ हे स्वयं अर्थ सहाय्यीत असेल. विद्यापीठ शासनाकडून कोणत्याही स्वरूपाचे इतर वित्तीय साहाय्य मिळण्यास हक्कदार असणार नाही आणि विद्यापीठात प्रवेश घेतलेला कोणत्याही प्रकारच्या वित्तीय सहाय्यासाठी किंवा शिष्यवृत्तीसाठी, शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी राज्य शासनाकडे मागणी करण्यास हक्कदार राहणार नाही. हे खाजगी विद्यापीठ विधेयक रद्द करावे या मागणीसाठी छात्रभारती अकोले च्या वतीने अगस्ती कॉलेज समोर विधेयकाची होळी करण्यात आली.
यावेळी छात्रभारतीचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, राज्य सहसंघटक गणेश जोंधळे, राज्य सदस्य विशाल शिंदे, जिल्हा अध्यक्ष राहुल जर्हाड, हर्षला तळेकर, प्रांजली आरोटे, अवधूत नवले, विशाल पगारे, भावेश राक्षे, प्रथमेश शेटे, जीवन हासे, उध्दव टेमगिरे, ऋषीकेश पोगळे, यश कडलग, आकांक्षा डगळे, गायत्री आरोटे, सचिन गायकवाड, ऋषिकेश वाघ, सुदर्शन दातखिळे, प्रवीण भवारी, श्रीपाल डावरे, अवधुत नवले, दिव्या धुमाळ, साक्षी वाळुंज, महेश इघे, तेजस्विनी कानवडे, यश कडलक, श्रुती वाळुंज आदि उपस्थित होते.