लाईफ ३६० डिग्रीला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद
शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी लाईफ ३६० डिग्री या गृह प्रकल्पास संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल १८० अत्याधुनिक सुख-सोयींनी सज्ज असलेला हा गृह प्रकल्प २७ वर्ष बांधकाम क्षेत्रातील वास्तूशास्त्रीय अनुभव असणारे एक्सल रिअल्टीचे संचालक श्री. विजय सानप आणि गृह निर्मिती क्षेत्रातील तब्बल १० वर्षांचा अनुभव असणारे माहिरा प्रॉपर्टीजचे संचालक श्री. चेतन ठाकरे यांच्या संयुक्तिक प्रयत्नातून स्थापित व्हेलॉसिटी इंफ्रा प्रोजेक्ट्सच्या अंतर्गत साकारला जात आहे. या गेटेड कम्युनिटीच्या गृह प्रकल्पात तब्बल ५६ हजार स्क्वेअर फुटांचं पोडीयम, २० हजार स्क्वेअर फुटांचा ओपन एरिया ११ हजार स्क्वेअर फुटांचे भव्य क्लब हाऊस आणि १० हजार स्क्वेअर फुटांचा रिक्रिएशनल फ्लोअर आहे. इन्फिनिटी स्विमिंग पुल, फुल साईज बॉक्स क्रिकेट, सेपरेट लेडीज व जेंटस् जिम सारख्या १८० अत्याधुनिक ॲमेनिटीज आहेत. याशिवाय येथे राहणाऱ्यांसाठी रोजच्या गरजांसाठी मिनी मॉल सुध्दा आहे.
निसर्ग संपन्न लोकेशन, योग्य किंमत, सर्व अत्याधुनिक सुख सोयीने परिपूर्ण हा गृह प्रकल्प वास्तूशास्त्रीय डिझाईन, नियोजन आणि संयोजनाच्या त्रिवेणी संगमातून साकारला जात असल्यामुळे ग्राहकांच्या आनंदाचे जीवन गाणे ठरतोय अशी माहिती याप्रसंगी श्री. विजय सानप यांनी दिली आहे. तर श्री. चेतन ठाकरे म्हणाले की, संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून आमच्या या प्रकल्पाला मिळणारा प्रतिसाद पाहता असा गृह प्रकल्प नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात यापूर्वी कधीही झाला नाही हे निश्चित होते. याशिवाय येथील कामाची गुणवत्ता, वापरात येणाऱ्या ब्रँडेड फिक्चर्स बद्दल स्पष्टता, व्यवहारातील पारदर्शता आणि सर्व टिम मेम्बर्सची मेहनत यामुळे आम्ही यशस्वी होत आहोत.
लाईफ ३६० डिग्रीत ५ सप्टेंबर पर्यंत शुभारंभाच्या दिवसांत पाथर्डी गाव सर्कल येथे साईटला भेट देता येणार असून सॅम्पल फ्लॅट इत्यादी बघता येणार आहे. त्यानंतर मात्र किंमतीत वाढ होणार आहे. त्यामुळे घराचं स्वप्न साकार करायचं असल्यास या पाच दिवसांत भेट देण्याचे आव्हान देखील डेव्हलपर्सनी केले आहे.