सीसीटीव्ही व पोलीसांमुळे चोरी उघड
फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने गोरख कुटे व पोनि. ढुमने यांचा सत्कार
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर– शहरालगत असणार्या वसंत लॉन्स येथे एका कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी फोटोग्राफर च्या कॅमेराच्या महागड्या दोन लेन्स चोरून नेल्या. मात्र लॉन्स मालक गोरख कुटे व शहर पोलीस निरीक्षक देवीदास ढुमने यांनी तत्परता दाखवून दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे सदर फोटोग्राफरचे लाखोंचे नुकसान वाचले. या बद्दल संगमनेर तालुका फोटोग्राफर व व्हिडिओ ग्राफर असोसिएशनच्या वतीने या दोन्ही मान्यवरांचे आभार व्यक्त करत सन्मान केला.
दिनांक 28 ऑगस्ट रोजी नगर रोडवरील वसंत लॉन्स याठिकाणी एक कार्यक्रमामध्ये ऋषीकेश डुबे रा. पेमगिरी शुटींगचे काम करत असताना अज्ञात इसमाने त्यांच्या कॅमेर्याच्या दोन लेन्स (किमंत दोन लाख) चोरून नेल्या. ही घटना लक्षात आल्यानंतर डुबे यांनी शोधाशोध केली. परंतु त्या मिळाल्या नाहीत. त्यानंतर याची माहिती लॉन्स मालव सामाजिक कार्यकर्ते गोरख यांना समजताच त्यांनी लॉन्स मधील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासणीची परवानगी देत सर्व प्रकारचे सहकार्य केले. त्यात दोन चोरटे कॅमेर्याचे लेन्स चोरी करताना ठळकपणे आढळून आले. हे सीसीटीव्ही फुटेज प्रभारी शहर पोलीस निरीक्षक देवीदास ढुमने यांच्याकडे सुपूर्द करताच त्यांनी तात्काळ या भामट्यांचा शोध घेत चोरी गेलेले कॅमेरा लेन्स ऋषीकेश डुबे यांना परत केले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर, उपाध्यक्ष कालिचरण पुरी, किरण डोंगरे, राम भागवत, निलेश शिंदे, निलेश मिसाळ, सिताराम कचरे, राजु शेलार, साई दिघे, किरण लहाटे, गोविंद गोसावी यांच्यास अनेक मान्यवर उपस्थित होते.