अकोलेत कडकडीत बंद तर संगमनेरात निषेध

दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर
– मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंदोलन करणार्‍या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठी चार्ज केल्याच्या निषेधार्थ अकोले शहरात कडकडीत बंद पाळून पोलीस व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. तर संगमनेर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने बस स्थानकासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. व दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.


मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने अनेक वेळा आंदोलन, मोर्चा काढण्यात आले. परंतु अद्यापपर्यंत समाजाला आश्‍वासनापलिकडे काही मिळाले नाही. त्यामुळे जालना जिल्ह्यातील अंतरवाटी याठिकाणी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरु आहे. दरम्यान हे उपोषण व आंदोलन पोलीस बळाच्या जोरावर मोडून काढण्यासाठी काल शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी प्रचंड लाठीचार्ज केला. यात अनेक आंदोलनकर्ते गंभीर जखमी झाले. पोलिसांनी आश्रु धुरांच्या नळकांड्या फोडल्या तर थेट गोळीबार देखील केला. आजपर्यंत सकल मराठा समाजाने 51 मोर्चा मोर्चे शांततेत काढले. हे आंदोलन देखील शांततेत सुरू होते. परंतु राज्यकर्त्यांच्या इशार्‍यावर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. याचा निषेध म्हणून व दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी या मागणीसाठी अकोले शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला तर संगमनेर शहरात बसस्थानकासमोर निषेध आंदोलन करत सकल मराठा सामाजाने कारवाई ची मागणी केली. यावेळी माजी आ. डॉ. सूधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, मिलिंद कानवडे, आर.एम. कातोरे, अमर कतारी, राजाभाऊ देशमुख, शरद नाना थोरात, अमोल कवडे, अविनाश सातपुते, अशोक सातपुते, सोमेश्‍वर दिवटे, विश्‍वास मुर्तडक आदिंसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख