संगमनेरकरांच्या सेवेत नव्याने सुरू
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – निरोगी व निरामय आयुष्याच्या दिशेने प्रवास सुखकर होण्यासाठी व चांगल्या जीवनशैलीसाठी संगमनेरकरांच्या सेवेत नव्याने सुरू होणार्या निर्माण ग्रुप संचलित एनर्जीम फिटनेस क्लबचा बुधवार दि. 31 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते होत आहे. अशी माहिती फिटनेस् क्लबचे संचालक अशिष रामलाल भंगिरे यांनी दिली.
संगमनेर शहरातील नविन अकोले बायपास रोडवरील मातोश्री कॉम्पलेक्स दुसरा मजला या ठिकाणी सुरू होत असलेल्या एनर्जीम फिटनेस क्लबमध्ये अत्याधुनिक व्यायामाचे सर्व साहित्य व सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अत्याधुनिक व भव्य फिटनेस् क्लबचे उद्घाटन राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी आ. डॉ. सुधीर ताबे, आ. सत्यजीत तांबे, माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या संचालिका शरयू देशमुख, एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या शुभहस्ते होणार असून याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.