नामवंत मान्यवरांच्या लेखांनी सजलेला दिवाळी अंक
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – 35 वर्षाची अखंड परंपरा असलेल्या साप्ताहिक संगम संस्कृतीच्या संगम दिवाळी अंकास ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालय कल्याण या संस्थेचा उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 10 फेब्रुवारी 2024 रोजी कल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
दरवर्षी प्रकाशीत होणार्या संपादक किसन भाऊ हासे, व कार्यकारी संपादक डॉ. संतोष खेडलेकर संपादित संगम दिवाळी अंकात राज्यातील नामवंत लेखक, साहित्यीक, विचारवंत आपले विचार प्रकट करत असतात. राज्यभरातून या दिवाळी अंकास मोठी मागणी असते. 2023 दिवाळी अंकासाठीही नामवंत मान्यवरांच्या लेखांनी हा दिवाळी अंक सजल्याने या अंकास हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.