संगमनेरात 650 किलो गोमांस जप्त

0
1714

तालुका पोलीसांकडून तेरा जनावरांची सुटका

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना संगमनेरात मात्र अजूनही खुलेआमपणे गोवंश जनावरांची कत्तल केली जात आहे. वारंवार याविरूद्ध कारवाया करूनही गोवंश कत्तल व तस्करी थांबलेली नाही. दरम्यान संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी व तालुका पोलीसांनी दोन वेगवेगळ्या स्वतंत्र कारवाया करत शहरातील जमजम कॉलनी येथे 1 लाख 30 हजार रूपये किंमतीचे सुमरे 650 किलो गोमांस व 2 लाख रूपये किंमतीचे मॅक्स पिकअप असा सुमारे 3 लाख 30 हजार रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला. तर तालुका पोलीसांनी तालुक्यातील निमज शिवारात छापा टाकून 60 हजार रूपये किंमतीचे 12 जिवंत वासरे तसेच 40 हजार रूपये किंमतीची काळ्या व पांढर्‍या रंगाची गाय तसेच 40 हजार रूपये किंमतीची पिकअप असा सुमारे 5 लाख रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एक व तालुका पोलीस ठाण्यात 1 असा दोघांवर प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.


याप्रकरणी माहिती अशी की, बुधवार 2 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना शहरातील जमजम कॉलनी येथे गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस हेड कॉ. संतोष फड, पोलीस नाईक शांताराम मालुंजकर, पो. कॉ. सारबंदे, पोलीस नाईक डोके नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन छापा मारला. यावेळी फारूक युसूफ सय्यद (रा. जमजम कॉलनी) याच्यासह मॅक्स पिकअप क्रमांक एमएच 12 एफडी 2456 या वाहनात 1 लाख 30 हजार रूपये किंमतीचे सुमारे 600 किलो गोमांस आढळून आले. त्यामुळे या पथकाने आरोपीला अटक करत सर्व मुद्देमाल जप्त केला. तर बुधवारी दुपारी वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनंतर तालुका पोलीसांनी निमज गावच्या शिवारात छापा मारून तौफीक नजीर पठाण (रा. कोल्हेवाडी) याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून वरील वर्णनाचे जनावरे व पिकअप वाहन जप्त केले. याप्रकरणी तालुका पोलीसांनी प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक उगले करत आहे. गोवंश कत्तलीवरून समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष व गुन्हेगारी वाढत असतांना अजूनही हे धंदे बंद होत नसल्याने नागरीकांमध्ये संताप व नाराजी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here