भक्ती, संस्कृती आणि एकतेचा संगम

श्रीरामनवमी निमित्त संगमनेर तालुक्यात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या 53 शाखांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. या अंतर्गत श्रीराम पूजन, भजन-कीर्तन, महाआरती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – श्रीरामनवमीच्या पावन निमित्ताने संगमनेर शहरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती – दुर्गावाहिनी, संगमनेर प्रखंड तसेच तमाम संगमनेरकरांच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत भव्य-दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेची सुरुवात सायंकाळी 6 वाजता अभिनव नगर, नवीन नगर येथील श्रीराम मंदिरात महाआरतीने झाली.
या महाआरतीस प्रा.एस. झेड. देशमुख सर, आमदार अमोल खताळ, उद्योजक मनीष मालपाणी सपत्नीक, संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे, सर्व नगरसेवक तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गावाहिनी व विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीपासूनच शहरातील चौकाचौकात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सनई-चौघडा, भजनी मंडळ, गोमाता, श्रीकृष्ण दर्शन, उज्जैन शैलीतील डमरू वादन, महादेव व दत्तमूर्ती, नवनाथांचा जिवंत देखावा, भारतमाता व खाटू श्यामजींच्या मूर्ती तसेच श्रीराम दरबाराचे देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. या सर्व देखाव्यांचे भाविकांनी मोठ्या उत्साहात दर्शन घेतले.

ही शोभायात्रा नवीन नगर रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, अशोक चौक, चावडी, मेन रोड, सय्यद चौक, तेलीखुंट, नेहरू चौक मार्गे चंद्रशेखर चौक येथे पोहोचली. मार्गावरील विविध चौकांमध्ये कंकाळ रथावरील कालिका माता अवताराचा लाईव्ह शो तसेच तिरुपती बालाजीचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मोटमल बॅण्डच्या जय श्रीराम घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. तरुणाईने उत्स्फूर्तपणे नृत्य करत उत्सवाचा आनंद लुटला. विशेष म्हणजे महिला व मुलींसाठी स्वतंत्र ‘लाडली डी.जे.’ची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात दिसून आला.
दरम्यान, नवीन नगर रोड येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह अरगडे मळा येथील मारुती मंदिर ट्रस्ट, बाजारपेठ मित्र मंडळ, मेन रोड व चंद्रशेखर चौक येथील स्वागत समित्यांनी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी, पेपर ब्लास्ट व फटाक्यांच्या आतिषबाजीद्वारे भव्य स्वागत केले. तसेच चहा, पाणी, सरबत व मठ्ठा चौका चौकात वाटप करण्यात आला.

एकूणच, धार्मिक उत्साह, सांस्कृतिक परंपरा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संगमनेरातील ही श्रीरामनवमी शोभायात्रा अविस्मरणीय ठरली. संगमनेरात धार्मिक उत्साह, संस्कृती आणि एकतेचा सुंदर संगम अनुभवास आला. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि भक्तिभावाने उत्सव अधिकच रंगतदार झाला.युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – श्रीरामनवमीच्या पावन निमित्ताने संगमनेर शहरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती – दुर्गावाहिनी, संगमनेर प्रखंड तसेच तमाम संगमनेरकरांच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत भव्य-दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेची सुरुवात सायंकाळी 6 वाजता अभिनव नगर, नवीन नगर येथील श्रीराम मंदिरात महाआरतीने झाली.

या महाआरतीस प्रा.एस. झेड. देशमुख सर, आमदार अमोल खताळ, उद्योजक मनीष मालपाणी सपत्नीक, संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे, सर्व नगरसेवक तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गावाहिनी व विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीपासूनच शहरातील चौकाचौकात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सनई-चौघडा, भजनी मंडळ, गोमाता, श्रीकृष्ण दर्शन, उज्जैन शैलीतील डमरू वादन, महादेव व दत्तमूर्ती, नवनाथांचा जिवंत देखावा, भारतमाता व खाटू श्यामजींच्या मूर्ती तसेच श्रीराम दरबाराचे देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. या सर्व देखाव्यांचे भाविकांनी मोठ्या उत्साहात दर्शन घेतले.
ही शोभायात्रा नवीन नगर रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, अशोक चौक, चावडी, मेन रोड, सय्यद चौक, तेलीखुंट, नेहरू चौक मार्गे चंद्रशेखर चौक येथे पोहोचली. मार्गावरील विविध चौकांमध्ये कंकाळ रथावरील कालिका माता अवताराचा लाईव्ह शो तसेच तिरुपती बालाजीचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

मोटमल बॅण्डच्या जय श्रीराम घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. तरुणाईने उत्स्फूर्तपणे नृत्य करत उत्सवाचा आनंद लुटला. विशेष म्हणजे महिला व मुलींसाठी स्वतंत्र ‘लाडली डी.जे.’ची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात दिसून आला.
दरम्यान, नवीन नगर रोड येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह अरगडे मळा येथील मारुती मंदिर ट्रस्ट, बाजारपेठ मित्र मंडळ, मेन रोड व चंद्रशेखर चौक येथील स्वागत समित्यांनी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी, पेपर ब्लास्ट व फटाक्यांच्या आतिषबाजीद्वारे भव्य स्वागत केले. तसेच चहा, पाणी, सरबत व मठ्ठा चौका चौकात वाटप करण्यात आला.
एकूणच, धार्मिक उत्साह, सांस्कृतिक परंपरा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संगमनेरातील ही श्रीरामनवमी शोभायात्रा अविस्मरणीय ठरली. संगमनेरात धार्मिक उत्साह, संस्कृती आणि एकतेचा सुंदर संगम अनुभवास आला. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि भक्तिभावाने उत्सव अधिकच रंगतदार झाला.