आधुनिक टाईल्स व मार्बलमुळे बांधकाम क्षेत्राला नवी चालना

संगमनेर
(युवावार्ता प्रतिनिधी)-
शहरातील बांधकाम व इंटेरियर क्षेत्रात नवे पर्व सुरू करत ‘साई मार्बल – आयकॉन टाईल द प्रायमा स्टोअर’चे भव्य उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. भंडारी परिवाराच्या वतीने आयोजित या सोहळ्यास मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मालपाणी ग्रुपचे संचालक गिरीशजी मालपाणी, आयकॉन ग्रुपचे संचालक चिंटुजी सरोडिया तसेच आयकॉन ग्रुपचे ए.आर.एम. किशोरजी कडू उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले.


यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात ‘साई मार्बल’च्या नव्या उपक्रमाचे कौतुक करत संगमनेरमध्ये दर्जेदार टाईल्स व मार्बलची उपलब्धता वाढणार असल्याचे सांगितले. आधुनिक डिझाईन्स, उत्कृष्ट गुणवत्ता आणि ग्राहकाभिमुख सेवा यामुळे हे स्टोअर ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन श्रीनिवास फुलचंद भंडारी, दर्शन मनोज भंडारी आणि हर्षित मनोज भंडारी यांनी केले होते. श्रीनिवास भंडारी हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायर चे ते माजी अध्यक्ष आहेत. प्रचंड जनसंपर्क असणारे श्रीनिवास भंडारी यांच्या नूतन स्टोअरला शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड जनसमुदाय एकवटला होता.कार्यक्रमास उद्योजक गिरिष मालपाणी, उद्योजक राजेश मालपाणी, उद्योजक मनिष मालपाणी, नगरसेविका रचना मालपाणी व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, मित्रपरिवार तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


संगमनेरमधील मोतिनगर, कॉलेज रोड परिसरात सह्याद्री कॉलेजसमोर, कृष्णा टेक्सटाईल मार्केटच्या मागे हे नवे दालन सुरू करण्यात आले असून, येथे ग्राहकांना विविध प्रकारच्या अत्याधुनिक टाईल्स आणि मार्बलचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. एकंदरच हा सोहळा उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला.





















