सेवानिवृत्त अधिकारी , कर्मचारी संघटनेच्या वतीने आमदार थोरात यांना विधानसभेसाठी जाहीर पाठिंबा

0
755

आमदार थोरात हे देशाचे नेते – प्रमोद कुलाट

आमदार थोरात हे देशाचे नेते – प्रमोद कुलाटआमदार थोरात हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग नवव्या वेळेस आपली उमेदवारी करीत आहे. काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासह त्यांनी कायम एकनिष्ठा ठेवली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीवर त्यांची निवड झाली असून ही सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे आमदार थोरात हे देशाचे नेते असल्याचे गौरवउद्गार प्रमोद कुलाट यांनी काढले आहे

संगमनेर प्रतिनिधी- राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक 2024 करिता संगमनेर मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात यांना तालुक्यातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संघटनांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. या पाठिंब्याचे पत्र कर्मचारी संघटनांच्या वतीने आमदार थोरात यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद कुलट, उपाध्यक्ष प्रमोद गुजर, खजिनदार अनिल ढोरे, सहसचिव अरुण सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आमदार बाळासाहेब थोरात हे सलग नव्यांदा संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करत असून त्यांच्या कार्याचा अवाका मोठा आहे. सध्या संघटनेचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सोडवावे.

This image has an empty alt attribute; its file name is job1.png


      यात सेवानिवृत्ती वेतन विक्रीचा, कपातीचा कालावधी पंधरा वर्षावरून दहा वर्षे करावा, केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त धारकांना महागाई भत्ता घोषित होतात त्याच महिन्यापासून लागू व्हावा. तसेच दरवर्षीच्या बजेटमध्ये पूर्वग्रहलक्षी प्रभावाने महागाई भत्त्याची तरतूद केलेली असते. केंद्राप्रमाणे त्याच महिन्यात महागाई भत्ता अदा झाला पाहिजे. कोविड कालावधीतील शासनाला मदत व्हावी म्हणून 18 महिन्यांचा महागाई भत्ता थकलेला आहे तोही त्वरित मिळणे गरजेचे आहे यांसह विविध मागण्या आमदार थोरात हेच विधानसभेत सोडवू शकतात म्हणून त्यांना संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत असे त्यांनी म्हटले आहे.

This image has an empty alt attribute; its file name is job1.png

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here