अखेर बिगुल वाजला, एकदाची निवडणूक जाहीर

0
307

राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, तर फक्त नगरपरिषद आणि नगर पंचायतीसंदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे.
ही पत्रकार परिषद नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात आहे. यावेळी निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या माध्यमातून एकूण 6हजार 859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे. ज्या 246 नगर परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे, त्यामध्ये दहा नवीन नगरपरिषदाांचा समावेश आहे. तर दुसरीकडे 42 नगर पंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यात 15 नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे, तर अजून 105 नगर पंचायतीची अजून मुदत संपलेली नाहीये.
राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, तर फक्त नगरपरिषद आणि नगर पंचायतीसंदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे म्हणाले, सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026 पूर्वी मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत राज्यातील 246 नगर परिषदा व 42 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. 6859 सदस्य व 288 अध्यक्ष यांची निवड होणार आहे. 246 नगरपरिषदांमध्ये 10 नवनिर्मित नगरपरिषदांचा समावेश आहे. 236 नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपली आहे. राज्यात 147 नगरपंचायती आहेत. त्यापैकी 42 नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. यात 15 नवनिर्मित पंचायती आहेत. 27 नगरपंचायतींची मुदत यापूर्वीच संपली आहे. उर्वरित 105 नगरपंचायतींची मुदत यापूर्वीच समाप्त झालेली नाही.
नगरपरिषदेची सदस्य संख्या सामान्यतः 20 ते 75 अशी आहे. नगरपंचायतीची सदस्यसंख्या ही 17 आहे. नगरपरिषदेची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीनुसार आहे. एका प्रभागात सर्वसाधारणपणे 2 जागा नगरपरिषदेत असतात. पण नगरपरिषदेचा सदस्यसंख्येचा आकडा विषम असेल तर तिथे 3 जागा असतात. म्हणजे साधारणतः मतदारांना 2-3 सदस्यांसाठी मतदान करावे लागेल.
उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा लागेल
नगरपंचायतीत 1 सदस्य व 1 अध्यक्ष असतो. त्यामुळे त्यात मतदारांना दोन मते द्यावी लागतील. नामनिर्देशन हे पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. आयोगाने यासंबंधी एक पोर्टल तयार केले आहे. उमेदवारांना त्यावर आपले अर्ज भरता येतील. एका प्रभागात एका उमेदवाराला अधिकाधिक 4 उमेदवारी अर्ज भरता येतील. संकेतस्थळावर अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे जाऊन जमा करावी लागेल. उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. पण ज्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे त्यांना अर्ज केल्याची पावती सादर करून आपला अर्ज भरता येईल.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर रोजी सुरूवात होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असेल. त्यानंतर 17 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची पडताळणी केली जाईल. अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर अशी असेल. तर अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 25 नोव्हेंबर ही असेल. 26 नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. याच दिवशी त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटपही केले जाईल. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. शासन राजपत्रात निकाल घोषित करण्याचा दिवस 10 डिसेंबर असेल.
दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी खास टूल
निवडणूक आयोगाने दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी एक टूल तयार केले आहे. त्यानुसार, ज्या मतदारांची दुबार नावे आहेत, त्या ठिकाणी दोन स्टार्स असतील. या मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल. त्या मतदाराला त्याला कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करायचे आहे हे विचारले जाईल. त्यानंतर त्यांनी पसंती दर्शवलेल्या मतदान केंद्रांवर त्यांना मतदान करता येईल. अशा प्रकारे दुबार मतदारांना एकाच मतदान केंद्रांवर मतदान करता येईल.
संबंधित मतदाराने काहीही संपर्क् केला नाही, तर सगळ्या मतदान केंद्रांवर डबल स्टार मतदार अशी नोंद केली जाईल. त्यानंतर हा मतदार मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आला तर त्याच्याकडून मी दुसऱ्या कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करणार नाही किंवा केले नाही असे प्रतिज्ञापत्र घेतले जाईल, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
राज्यात एकूण किती मतदार?
एकूण मतदार – 1 कोटी 7 लाख 3 हजार 576

महिला मतदार – 53 लाख 22 हजार 870

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार मतदान होणार आहे. त्यामध्ये एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार असतील. त्यामध्ये 53 लाख 22 हजार 870 महिला मतदार असतील. या निवडणुकांसाठी राज्यात एकूण 13 हजार कन्ट्रोल युनिट स्थापन करण्यात आले आहेत.
महिलांसाठी खास गुलाबी मतदान केंद्र
निवडणूक आयोगाने यावेळी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 32 कॅम्पेन बनवण्यात आल्याचीही माहिती दिली. दिव्यांग मतदार, तान्या बाळासह स्त्रिया, ज्येष्ठांना पहिल्यांदा मतदान करू दिले जाईल. अनेक ठिकाणी गुलाबी मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर सर्व अधिकारी व कर्मचारी या महिला असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here