पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट अभ्यास मंडळाचे चेअरमनपदी अमृतवाहिनीचे प्राचार्य डॉ लोंढे यांची निवड

0
1959

अमृतवाहिनी एमबीएच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

संगमनेर (प्रतिनिधी)- शैक्षणिक वर्ष 2022- 23 करिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अभ्यास मंडळाच्या चेअरमनपदी अमृतवाहिनी एमबीए  चे संचालक डॉ बी एम लोंढे यांची  निवड झाली आहे.

या निवडीबद्दल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी डॉ बी एम लोंढे यांचा सत्कार केला असून यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आदींसह विविध प्राचार्य उपस्थित होते.

डॉ. बी एम लोंढे हे अमृतवाहिनी एमबीएचे संचालक म्हणून कार्यरत असून ऑर्गनायझेशन बिहेवियर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड जनरल मॅनेजमेंट या विषयातील ते प्राध्यापक आहे. त्यांना व्यवस्थापन शास्त्राच्या संस्था मधून पंचवीस वर्षापेक्षा जास्त अध्यापनाचा अनुभव आहे. पुणे विद्यापीठाची संलग्न असलेल्या त्यांनी विद्यापीठाच्या विविध एलआयसी, स्टाफ सिलेक्शन ,सिलॅबस डिजाइनिंग, अकॅडमी ऑडिट इत्यादी विविध विद्यापीठ स्तरावरील समित्यांमध्ये  योगदान दिलेले आहे. विशेष म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विद्या शाखेवर कुलगुरूंचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून पाच वर्षे काम केले आहे त्यांची निवड पुढील पाच वर्षासाठी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अभ्यास मंडळाचे चेअरमन म्हणून करण्यात आली आहे.

डॉ लोंढे हे ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट या विषयांतर्गत व्यवस्थापन शास्त्राचे एचडी चे मार्गदर्शक म्हणून सुद्धा कार्यरत आहे .त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत चार विद्यार्थ्यांना पीएचडी प्रदान झालेली आहे. तर सहा विद्यार्थी पीएचडीचे संशोधन करत आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, मा.आ. डॉ सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. विवेक धुमाळ, प्राचार्य डॉ. एम ए.व्यंकटेश, प्राचार्य डॉ मच्छिंद्र चव्हाण, प्राचार्य डॉ मनोज शिरभाते आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here