नेहमीच नगरपालिकेला सहकार्य करणाऱ्या व्यापाऱ्यांवरच पालिका कर्मचाऱ्यांची दादागिरी

व्यापार्‍यांसोबत अशी वागणूक बघून ग्राहकही अवाक

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
संगमनेर शहराची बाजारपेठ म्हणजे गावचा प्रचंड वर्दळीचा भाग. या भागात ग्राहकांची सतत रेलचेल सुरू असते. अनेक व्यापारी आपल्या दुकानासमोर ऊन/पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी ताडपत्रीची पाल टाकत असतात. दरम्यान या भागातून दरवर्षी अनेक मिरवणुका जातात. मिरवणुकीच्या आधी व्यापार्‍यांना पाल काढण्याच्या सूचना नगरपालिकेकडून दिली जाते आणि त्या सूचनांचे पालन करत व्यापारी मिरवणुकीच्या आदल्या संध्याकाळी सगळ्या ताडपत्री काढून घेतात. त्या मार्गावरून जाणार्‍या मिरवणुकांमध्येही या व्यापारी वर्गाचा उल्लेखनीय सहभागही असतो.


दरम्यान आषाढी एकादशी निमित्त बाजारपेठेतून अनेक दिंड्या जात असतात. त्याबद्दल व्यापार्‍यांना काही दिवसांपूर्वीच सूचना करण्यात आली होती. त्यानुसार येथील व्यापारी आपापले पाल काढणार होते मात्र काल संध्याकाळच्या आधीच अचानक नगरपालिकेचा जेसीबी आला. आणि सोबत नगरपालिकेचे कर्मचारी होते. त्यातील एक वादग्रस्त कर्मचार्‍याने सरसकट सगळ्या दुकानांसोरच्या ताडपत्री कापत सुटले. काही व्यापार्‍यांनी त्यांना विचारणा केली असता अतिशय उद्धट आणि उर्मटपणे उत्तरे दिली. महिलांशी बोलतानाही अतिशय अपमानास्पद भाषेचा त्यांनी वापर केला. नगरपालिकेच्या सगळ्या सूचनांचे पालन करणार्‍या या व्यापार्‍यांसोबत अशी वागणूक बघून ग्राहकही अवाक झाले. जे लोक कर्मचार्‍यांना सहकार्य करतात त्यांनाच प्रशासनातर्फे धारेवर धरण्यात येते. ज्या ठिकाणी अवैध पद्धतीने अतिक्रमण करून व्यवसाय केले जातात तिथे कारवाई करायला मात्र यांची हिम्मत होत नाही. कारण तिथे मार खाण्याची भीती असते. मात्र गप गुमान सहन करणार्‍यांनाच या दादागिरीचा सामना करावा लागतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख