ग्रील इन फास्ट फूड ठरणार खवय्यांचे मुख्य आकर्षण


संगमनेरात पहिल्यांदाच सर्व प्रकारचे स्वादिष्ट फास्ट फूड एकाच ठिकाणी

ग्रील इन हाॅटेलचा भव्य शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –

संगमनेर येथील ग्राहक केवळ वस्तुंच्या खरेदीमध्येच चोखंदळ नाही तर ते खवय्येगिरीमध्येही प्रचंड चोखंदळ व पुढारलेले आहेत. या अस्सल खवय्यांसाठी इंडिया’ज फेवरेट फास्ट फूड चैन च्या वतीने ग्राहकांची आवड निवड, बदललेली शैली लक्षात घेऊन ग्रील इन च्या माध्यमातून फास्ट फूड चे भव्य दालन ग्राहकांच्या सेवेत सुरू केले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या शहर बसस्थानक जवळील नवीन अकोले रोडवरील एम जी ग्रॅंड होटेल खाली, सावतामाळी नगर येथे भव्य व आधुनिक पध्दतीने उभारले ग्रील इन हे हाॅटेलचा भव्य शुभारंभ आज शुक्रवारी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.


संगमनेर शहराची बाजारपेठ जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून गणली जाते. रोज हजारो नागरिक विविध खरेदीसाठी संगमनेरात येत असतात. या नवीन ग्राहकांची, काॅलेज तरुणांची व शहरातील खवय्यांना आकर्षीत करणारे त्यांच्या जीभेचे लाड पुरविण्याबरोबरच त्यांची भुक भागविण्यासाठी ग्रील इन हे आकर्षक व भव्य दालन संगमनेरात सुरू करण्यात आले आहे. या वातानुकूलित दालनात आरामदायी बैठक व्यवस्था, स्वच्छता, मोकळी हवा, मोकळी जागा, निवांतपणा व सोबत नम्र सेवा देणारे कर्मचारी. याठिकाणी आलात तर आपल्याला बर्गर मधील व्हेज – नाॅन व्हेज च्या विविध प्रकारच्या अनेक डिश, पिज्जा मधील व्हेज, नाॅन व्हेज डिश, सॅण्डविच चे अनेक प्रकारातील डिश, फ्राईड चिकन, ग्रीलिड चिकन, स्नॅक्स, पास्ता, कोल्ड्रिंक्स, यासह अनेक प्रकारचे फास्ट फूड याठिकाणी मिळणार आहे.


स्वच्छ, प्रसन्न वातावरण, नम्र सेवा आणि तितकेच स्वादिष्ट फास्ट फूड मिळणार असल्याने हे ठिकाण लवकरच संगमनेरकरांचे आवडते ठिकाण होणार यात शंका नाही. घरपोच सेवेसाठी 7822080050 हा क्रमांक आपल्या सेवेत असणार आहे.संगमनेरच्या तरूणाईच्या पसंतीस उतरेल अशा या ग्रील ईन हॉटेलची निर्मिती करण्यात आली असून संगमनेरकरांच्या सेवेची संधी द्यावी व फास्ट फुड खाद्यसेवेचा अस्वाद घ्यावा असे आवाहन दादाभाऊ सागर व सागर परिवाराने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख