कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्काराचे वितरण

पृथ्वीराज चव्हाण, रमेश चेन्नीथला, जितेंद्र आव्हाड, भास्करराव जाधव, एच. के. पाटील यांची उपस्थिती

उल्हास दादा पवार यांना भाऊसाहेब   थोरात स्मृती पुरस्कार तर जैन उद्योग समूहास डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या  पुतळ्याचे अनावरण

अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने साखर कारखाना नूतन कार्यालयाच्या समोर उभारण्यात आलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या  पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

जयंती महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असून जाणता राजा मैदानावर सोमवार दिनांक 8 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वा. स्थानिक कलाकारांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम आनंद सोहळा हा होणार आहे. तर मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7 वा होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर प्रस्तुत  खेळ मांडीयेला हा कार्यक्रम होणार आहे. तसेच गुरुवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता  बॉलीवूड मधील आघाडीचा पुष्पा फेम गायक जावेद आली यांचा लाईव्ह कॉन्सर्ट बॉलीवूड आणि सुफी गाण्यांचा जल्लोष हा कार्यक्रम होणार आहे. तसेच शुक्रवारी 12 जानेवारी 2024 रोजी स.8 वा.प्रेरणा दिन आणि पुष्पांजलीच्या कार्यक्रमानिमित्त बापू तेरे रास्ते सौ सुरभी आणि सचिन ढोमणे प्रस्तुत भजनांचा कार्यक्रम प्रेरणास्थळ येथे होणार आहे.

संगमनेर (प्रतिनिधी) थोर स्वातंत्र्यसेनानी अमृत उद्योग समूहाचे संस्थापक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार व डॉ अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वितरण रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1 वा. जाणता राजा मैदान येथे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री ना. सिद्धरामय्या  यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला व कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती  मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.

यशोधन जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मा. आ. डॉ सुधीर तांबे यांनी माहिती दिली यावेळी समवेत मा. महसूल मंत्री तथा मा प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हे होते

यावेळी ते म्हणाले की, 2023 24 हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबरोबर अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने साहित्य, सहकार, समाजकारण, कृषी,पर्यावरण या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल संत साहित्याचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ नेते उल्हास दादा पवार यांना स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे तर कृषी ,शिक्षण ,संशोधन, पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ .अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने जैन उद्योग समूह जळगाव यांना गौरवण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख सन्मानचिन्ह ,शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्या वतीने सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारातील नेते आमदार पी एन पाटील यांना दिला जाणार आहे..

रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1 वा. जाणता राजा मैदान येथे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री नामदार सिद्धरामय्याजी यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी प्रभारी व कर्नाटकचे मंत्री एस के पाटील, विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे लढवय्ये नेते आमदार भास्करराव जाधव ,मा. आ डॉ सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी राज्यभरातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच
याचबरोबर 7 जानेवारी ते 12 जानेवारी या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

तरी या सर्व कार्यक्रमांसाठी संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जयंती महोत्सव समितीचे निमंत्रक आमदार सत्यजित तांबे व एकविरा फाउंडेशन च्या अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात ,जयंती महोत्सव समिती व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख