काँग्रेसला चांगले वातावरण, संघटन वाढवा – आ. बाळासाहेब थोरात

0
1567



जिल्हा काँग्रेसची पदाधिकारी बैठक संपन्न

युवावर्ता (प्रतिनिधी)

संगमनेर – काँग्रेसचा विचार हा गोरगरिबांच्या विकासाचा शाश्वत विचार आहे. अहमदनगर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून मंडल पातळीसह तालुका पातळीवरील सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या  नव्या नियुक्ती करा. तरुणांना अधिक सक्रिय करताना पक्षाचे संघटन वाढवा . सर्व आगामी निवडणुकांसाठी  काँग्रेसला चांगले वातावरण असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर अहमदनगर जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे होते तर व्यासपीठावर आमदार लहू कानडे, मधुकरराव नवले, उत्कर्षताई रुपवते, डॉ एकनाथ गोंदकर, युवक काँग्रेसचे स्मितल वाबळे, ज्ञानदेव वाफरे ,मिलिंद कानवडे, सुभाष सांगळे, दादा पा वाकचौरे ,आकाश नागरे, सोमेश्वर दिवटे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यात बाजार समितीमध्ये काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे. आगामी सर्व निवडणुका या पूर्ण ताकतीने लढवायची असून अडचणीच्या काळात कार्यकर्त्यांना मोठी संधी असते .काँग्रेसचा विचार हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा विचार आहे .भाजपने अनेक चुका केल्या असून जनतेमध्ये भाजपा बद्दल तीव्र नाराजी आहे. ही नाराजी कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा. जिल्ह्यात काँग्रेसचे कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्या सर्वांना सक्रिय करा. मंडल पातळीवर विविध सेलच्या नियुक्ती करा. नव्या चेहऱ्यांना संधी देताना त्यांना जबाबदाऱ्या द्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवता येईल .

भाजपच्या चुका आणि राहुल गांधी यांनी केलेले काम याचबरोबर सातत्याने माणसे जोडण्याचा काँग्रेसचा विचार हेच आपले मोठे भांडवल असून सर्वांनी एकजुटीने पक्षासाठी काम करा . कर्नाटकच्या निवडणुकीने भाजपाच्या घसरण सुरू झाली असून काँग्रेसच्या विजयाची मोठी सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाला मोठे अनुकूल वातावरण असल्याने तरुणांना राजकारणात मोठी संधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.तर आमदार कानडे म्हणाले की देशात सर्वत्र महागाई भ्रष्टाचार वाढला आहे . शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटात सापडला आहे. भाजप जनतेच्या भावनेशी खेळत असून राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुका लागतील यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आव्हाने त्यांनी केलेतर राजेंद्र दादा नागवडे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यात अधिक भक्कम होईल यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियतीने काम करा असे आवाहन केले .यावेळी डॉ एकनाथ गोंदकर, उत्कर्षा ताई रुपवते, मधुकरराव नवले, स्मितल वाबळे ज्ञानदेव वापारे यांनीही मनोगत व्यक्त केले.

या बैठकीसाठी सचिन गुंजाळ, सोन्याबापु वाकचौरे, निखिल पापडेजा,  अजय फटांगरे, सिताराम राऊत, किरण पाटील, कैलास शेवाळे, अडवोकेट माणिक पोटे ,अरुण पाटील नाईक ,समीर बागवान, सचिन गुजर , संभाजी रोहकले, योगेश भोईटे, प्रशांत दरेकर, अरुण मस्के, राहुल उगले,अर्चनाताई बालोडे, मंदाताई नवले ,लताताई डांगे, दत्तू कोकणे ,तुषार पोटे ,राहुरीचे बाळासाहेब आढाव, पंकज लोंढे, सचिन चौगुले, आदींसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे प्रास्ताविक ज्ञानदेव वाफारे यांनी केले


कर्नाटक काँग्रेसच्या अभिनंदनचा ठराव

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला 130 पेक्षा जास्त जागांवर पक्षाला मोठा विजय मिळाला असल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी व पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या अभिनंदनचा ठराव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजूर करण्यात आला..

सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा

2014 मध्ये भाजपाने सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचताना सत्ता मिळवली . काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही लोकशाहीचा व देश विकासाचा विचार प्रत्येकापर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल माध्यमांच्या सर्व प्लॅटफॉर्मचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहन काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

3 Attachments • Scanned by Gmail

ReplyReply allForward

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here