संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाचे घवघवीत यश


चार उमेदवार बिनविरोध
13 पैकी 12 जागांवर शेतकरी विकास मंडळाचा विजय

युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर-
येथील संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळाने याही निवडणूकीत घवघवीत यश मिळवत आपले वर्चस्व कायम राखले आहे. संचालक मंडळ निवडणूकीत १३ जागांपैकी १२ जागांवर शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.या निवडणुकीसाठी संगमनेर औद्योगिक वसाहतीचे विद्यमान अध्यक्ष भाऊसाहेब एरंडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाच्या सहा जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित सात जागांसाठी १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे सात जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष भाऊसाहेब रखमा एरंडे, रोहित राजेश चौधरी, मच्छिंद्र शरद जगताप, किसन केशवराव थोरात, सोमनाथ रामनाथ पाबळकर, पियुष ओंकारनाथ भंडारी, नानासाहेब हरिभाऊ वर्षे, अमित रामनाथ सोनवणे, नितीन शिवाजी हासे, गोरक्ष भाऊराव सोनवणे या दहा उमेदवारांमध्ये लढत झाली.


विजयी उमेदवार व त्यांना मिळालेले मतदान पुढील प्रमाणे- कारखानदार मतदारसंघ :- कारखानदार सर्वसाधारण प्रतिनिधी भाऊसाहेब रखमा एरंडे (९३), किसन केशवराव थोरात (८९), रामनाथ पाबळकर (९६) पियुष ओकारनाथ भंडारी (१००), अमित रामनाथ सोनवणे (८३), नितीन शिवाजी हासे (८८), गोरक्ष भाऊराव सोनवणे (७९) अशा मताधिक्याने हे उमेदवार निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एस. वाकचौरे यांनी काम पाहिले. विजयी उमेदवारांचे आ. बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे

  • सर्वसाधारण कारखानदार सोसायटी प्रतिनिधी – सिनारे शांताराम गेणू (रा. चिखली), अनुसुटित जाती /जमाती प्रतिनिधी – मेढे शांताराम भागाजी (रा. संगमनेर), महिला प्रतिनिधी – गग्गड रूपाली श्रीकांत (रा. संगमनेर), उगले कोमल विजय (रा. संगमनेर), इतर मागसवर्गीय प्रतिनिधी – गडगे राहुल दत्तात्रय ( रा. बोरबर, पो. घारगाव, ता, संगमनेर), वि. जा. भ. ज. /विशेष मागसवर्ग प्रतिनिधी – वाव्हळ शिला विकास (रा. संगमनेर हे बिनविरोध निवडून आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख