
शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर नौदलाला बळकट करण्यासाठी मोठे पाऊल – मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत बुधवार, १५ जानेवारी रोजी ‘आयएनएस सुरत’, ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौका आणि ‘आयएनएस वगशीर’ ही पाणबुडी नौदलात दाखल होत आहे. देशाच्या युद्धसज्जतेत त्यामुळे वाढ होणार आहे. नौदलाच्या या प्रमुख युद्धनौका आणि पाणबुडीच्या निर्मितीमुळे जागतिक पातळीवर संरक्षण क्षेत्रातल्या आणि सागरी सुरक्षेशी संबंधित उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित होणार आहे. नौदलाच्या वाढत्या युद्धसज्जतेचा हा आढावा. ‘आयएनएस सुरत’ युद्धनौका- ही युद्धनौका ‘प्रकल्प १५ बी’ अंतर्गत विनाशिका प्रकारातील आहे. गेल्या तीन वर्षांत नौदलात दाखल झालेल्या ‘आयएनएस विशाखापट्टणम’, ‘मोरमुगाओ’ आणि ‘इम्फाळ’ या युद्धनौकांनंतर ‘आयएनएस सुरत’ ही युद्धनौका आता नौदलात दाखल होत आहे.
या प्रकल्पातील ही अंतिम युद्धनौका आहे. सर्वांत मोठी आणि अतिशय आधुनिक अशा विनाशिकांपैकी ही एक. ती ७५ टक्के देशी बनावटीची आहे. ‘प्रकल्प १५’ अंतर्गत १९९७ ते २००१ या काळात तीन ‘दिल्ली’ वर्गातील, त्यानंतर ‘प्रकल्प १५ ए’ अंतर्गत २०१४ ते २०१६ या काळात तीन ‘कोलकाता’ वर्गातील आणि ‘प्रकल्प १५ बी’ अंतर्गत २०२१ ते २०२४ या काळात चार ‘विशाखापट्टणम’ वर्गातील युद्धनौका नौदलात दाखल झाल्या आहेत. युद्धनौकेचे वजन ७४०० टन असून ती १६४ मीटर लांब आहे. अद्ययावत शस्त्रांनी सज्ज आहे. युद्धनौकेवर चार गॅस टर्बाइन असून ३० नॉटिकल मैल (तासाला ५६ किलोमीटर) वेगाने ती जाऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची क्षमता असलेली ही पहिलीवहिली युद्धनौका आहे. यामुळे नौकेची कार्यक्षमता काही पटींनी वाढली आहे.
शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर नौदलाला बळकट करण्यासाठी मोठे पाऊल – मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “भारताच्या सागरी वारशासाठी, नौदलाच्या गौरवशाली इतिहासासाठी आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी आजचा दिवस खूप मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाला नवीन शक्ती आणि एक नवीन दृष्टीकोन दिला होता. आज, त्यांच्या पवित्र भूमीवर, आपण 21 व्या शतकातील नौदलाला बळकट करण्याच्या दिशेने एक खूप मोठे पाऊल उचलत आहोत. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एक विनाशकारी, एक फ्रिगेट आणि एक पाणबुडी, तिन्ही एकाच वेळी कार्यान्वित होत आहेत.”