
“प्रशासनाचा कसून वार, अतिक्रमणाची वीट रोखली वारंवार”
श्रीनिवास वर्पे, रामदास कोकरे, रविंद्र देशमुख आणि शाम मिसाळ यांच्या संयुक्त प्रयत्नांची प्रशंसा
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- संगमनेर शहरातून जाणारा पुणे-नाशिक हायवे रूंदीकरणासाठी अमृतवाहिनी इंजिनिअरींग कॉलेज ते एसटी स्टॅण्ड व रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द प्रशास्त स्वरूपात तयार झाला. परंतू एसटी स्टॅण्ड ते दिल्ली नाका पुढे अमरधाम पर्यंत अतिक्रमण काढण्यास अडचणी येत असल्याने हे काम थांबले होते.
छाया – प्रसाद सुतार
अतिक्रमण धारकांना वारंवार नोटीसा देऊनही अतिक्रमण निघत नसल्याने शहरातील रहदारीची कोंडी सहन करावी लागत आहे. संगमनेर शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासन यंत्रणेने अतिक्रमणधारकांना अंतिम नोटीसा देऊन आज मंगळवारी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहिमेत कोही उद्योजकांनी त्यांचे अतिक्रमण अगोदरच काढल्याने त्यांचे नुकसान टळले. मात्र विरोध करण्याच्या भुमिकेतून अतिक्रमण ठेवलेल्या उद्योजकांचे नुकसान झाले आहे.
छाया – प्रसाद सुतार
अनेक उद्योजकांनी पक्के बांधकामाच्या पुढे पत्र्याच्या शेड, ओटे बांधल्याने रहदारीस सतत अडथळा असायचा. काही ठिकाणी कायद्याच्या बाबी पुढे करून अतिक्रमणधारक अडचणी निर्माण करण्याच्या प्रवृत्तीमुळे प्रशासनाने कायदेशीरबाबी पुर्ण करून अतिक्रमण निर्मुलनाची कठोर कारवाई पुर्ण केली आहे.
पुणे रोडबरोबरच नगर रोडवरील टपर्या, शेड, हातगाड्या, पथारीवाले यांनी निर्माण केलेले अतिक्रमण हटविण्यात आले आहे. संगमनेर शहराचे सौंदर्यात प्रशस्त रस्त्यांची भर पडत असतांना अतिक्रमणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाने केलेल्या कारवाईचे स्वागत होत आहे.
छाया – प्रसाद सुतार
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अतिक्रमण हटाव मोहिमेत कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर उपविभागाचे उपअभियंता शाम मिसाळ यांनी त्यांच्या यंत्रणेद्वारे अतिक्रमण हटाव मोहिम नियोजनबद्दरित्या राबविली आहे. त्यांचे सहकार्यास संगमनेर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामदास कोकरे यांनी संगमनेर नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाद्वारे या मोहिमेस सहकार्य केले आहे. संगमनेर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख व त्यांच्या सहकार्यांनी पोलीस बंदोबस्त देऊन अतिक्रमण हटाव मोहिम यशस्वी करण्यास सहकार्य केले आहे.
संगमनेर शहर अतिशय सुंदर आहे. परंतु अतिक्रमण झाल्यामुळे शहरात वाहन चालवणे तसेच पायी चालणे देखील मुश्किल झाले होते. आणी एक सुंदर शहर अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्याने आम्ही शहराच्या बाहेरूनच रस्ता शोधायचो, आणखी एक गोष्ट पालिकेने करावी ती म्हणजे वाहन पार्कींग असलेल्या बांधकामांना मंजुरी द्यावी. म्हणजे रस्ते मोकळे राहातील. आणी हि कारवाई तिन महिन्यात एकदा तरी करावी.