ठिबक सिंचन पाईप चोरांची टोळी गजाआड

संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धडक कारवाई

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
शेतकरी मोठ्या कष्टातून आपल्या शेतात ठिबक सिंचन करतात. त्यासाठी लाखो रूपयांचे पाईप, मोटार, असे साहित्या बसवतात मात्र चोरटे या साहित्याची परस्पर चोरी करून शेतकर्‍यांवर अडचण निर्माण करतात. तालुक्यात ठिबक सिंचन पाईप चोरीच्या अनेक घटना घडलेल्या आहे. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या पाईप चोरांच्या टोळीचा पडदाफाश करत दोन चोरट्यांना गजाआड केले आहे. फरदीन इसाक शेख, नवशाद इसाक शेख (दोघेही रा. अकोले नाका, संगमनेर ) यांना या प्रकरणात अटक केली आहे.


मागील काही दिवसांपासून तालुक्यात पाईप चोरी यात जलजीवन मिशन व ठिबक सिंचन पाईपांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपूर्वी जलजीवन मिशनचे पाईप चोरणारी टोळी गजाआड केली होती. तर आता उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी ठिबक सिंचन चोरीचा तपास लावत कारवाई केली आहे. घारगाव पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन, आश्‍वी पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल असलेल्या तक्रारीवरून चोरट्यांचा शोध सुरू असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी वाघचौरे यांना गुप्त खबर्‍यामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार चोरट्यांना पकडण्यासाठी नाकाबंदी, कॉम्बींग ऑपरेशन, आरोपींच्या घरावर छापे अशी कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान पकडलेले फरदीन इसाक शेख व नवशाद इसाक शेख हे दोन्ही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर संगमनेर, अकोले, शहर तालुका अशा विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पुढे आले. दरम्यान 28 ऑगस्ट रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास तालुक्यातील नांदूरी दुमाला येथील एका शेतकर्‍याच्या घरासमोरून तीन ते चार चोरटे एका जीपमधून ठिबकचे पाईप चोरून नेत असतांना ग्रामस्थांनी पाठलाग केला. मात्र चोरटे गाडी सोडून पळून गेले होते.


याप्रकरणाचा तपास केला असता वरील चोरट्यांबाबत पोलीसांना माहिती मिळाली. अधिक चौकशी करून व पोलीशी खाक्या दाखवल्यानंतर या चोरट्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. वरील दोन्ही चोरट्यांना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर चोरट्यांवर या अगोदर अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असल्याने पोलीस त्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला व सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. वमने, उपविभागीय पथकातील राहुल डोके, पोलीस कॉ.राहुल सारबंदे, तालुका पोलीस स्टेशनचे सचिन उगले आदि सहभागी होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख