आ. सत्यजित तांबे यांची सदिच्छा भेट
ब्रँण्डेड कपड्याचे भव्य दालन असेले स्पायकर या रेडिमेड शॉपीचा नुकताच भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी स्पायकर या वस्त्र दालनाला भेट देली. यावेळी त्यांचा सत्कार करतांना या फर्मचे संचालक ऋषीकेष ढाकणे सोबत एकनाथ ढाकणे, बी.जे. आमटे, नितीन अभंग, निखिल पापडेजा उपस्थित होते.
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील नाशिक पुणे महामार्गावरील जय जवान चौकाजवळ स्पाईकर शॉपीचे नुकतेच थाटात विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. ग्राहकांच्या आवडी निवडी सोबतच रास्त भाव यामुळे स्पाईकर शॉपी ग्राहकांचे आवडीचे व हक्काचे ठिकाण बनत आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजितदादा तांबे यांनी स्पायकर शॉपी अर्थात ब्रॅण्डेड कपड्याचे वस्त्र दालनाला भेट देऊन स्पायकर शॉपीला शुभेच्छा देत आयोजकांचे कौतुक केले. यावेळी बाळासाहेब आमटे पाटील व ऋषिकेश एकनाथराव ढाकणे यांनी ग्राहकांचे हित जपत सुरू केलेल्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. युवकांमध्ये, युवतीमध्ये स्पायकर ब्रांडेड कपड्यांची क्रेझ आहे आणि संगमनेर सारख्या पुढारलेल्या तालुक्यांमध्ये ही ब्रॅण्डेड दुकान टाकून निश्चितच तरुणाईच्या पसंतीला उतरत आहे. ऋषिकेश ढाकणे यांनी सुरू केलेला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे आ. सत्यजित तांबे यांनी सांगितले. स्पायकर शॉपीच्या वतीने ग्रामसेवकांचे नेते एकनाथराव ढाकणे व बाळासाहेब आमटे पाटील यांच्या हस्ते आ. तांबे यांचा सन्मान करण्यात आला.