शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमणावर कारवाई

0
175

संगमनेर 2.0 ची कडक अंमलबजावणी सुरू

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने ‘संगमनेर 2.0 – खीं’ी ढळाश ढे णसिीरवश!’ ही व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेची सुरुवात करण्यात आली असून नव्या कडक परंतु शिस्तीच्या नियमांची अंमलबजावणीनूसार शहरातील नवीन नगर रोड, बसस्थानक परिसर, नवीन अकोले रोडसह महत्त्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमणावर कारवाई सुरू करण्यात आली असल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.
शहर स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक संगमनेरकराची नैतिक जबाबदारी आहे, असा ठाम संदेश देत नागरिकांना ‘भागीदार’ म्हणून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानूसार काही नागरिकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घेतले. ज्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही त्यांच्या अतिक्रमणावर आज सोमवारी सकाळी पालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या नेतृत्वाखाली, पालिका कर्मचारी व पोलीस बंदोबस्तात नगरपालिकेकडून थेट बुलडोझर चालविण्यात आला.

रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी विशेष करून ही कारवाई करण्यात आली. नवीन नगर रस्त्यावरील नगरपालिकेच्या गाळा धारकांनी दुकानासमोर मोठ्या पाट्या, ओटा बांधकाम केले होते. त्यामुळे वाहतूकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत होता. अशा दुकानदारांनी दुकानासमोरील वाढीव ओटे, शेड, अनधिकृत फलक त्वरित काढून टाकावेत असे आवाहन नगरपालिकेने नोटिसीद्वारे केले असताना देखील या दुकानदारांनी ते अतिक्रमण न काढल्याने पालिकेने थेट जेसीबी द्वारे हे फेल्प्स व ओटे तोडून टाकले.
नगरपालिकेने शहर स्वच्छ व अतिक्रमणमुक्त करण्यासाठी, वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी काही कठोर निर्णय घेतले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे. पालिकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. आकारलेला दंड न भरल्यास तो संबंधितांच्या मालमत्ता करात समाविष्ट केला जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

ऐन सणासुदीच्या दिवशी कारवाईने व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्याचबरोबर शहरात काही धनदांडग्यांनी मोठमोठे अतिक्रमण केले आहे त्यावर पालिका गप्प रहाते आणि गोरगरीबांच्या रोजीरोटीवर लाथ मारली जात आहे. अतिक्रमण काढायचेच असेल तर पहिले त्यांच्यावर कारवाईची हिंमत दाखवा मग आमच्यावर कारवाई करा अशी संतप्त प्रतिक्रिया टपरीधारक संघटनेचे सदस्य दिपक साळुंखे यांनी व्यक्त केली आहे.


हे आता करावंच लागेल!
प्रशासनाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, काही नियम तात्काळ कठीण वाटू शकतात; मात्र ते शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहेत.
संगमनेर सुंदर, स्वच्छ आणि आदर्श बनविण्याची ताकद आपल्या प्रत्येकाच्या सहभागात आहे. चला, नियम पाळूया आणि संगमनेरला महाराष्ट्रातील आदर्श शहर बनवूया, असे आवाहन नगराध्यक्षा डॉ. तांबे यांनी केले होते. या आवाहनाला काही ठिकाणी प्रतिसाद देखील मिळत आहे तर काही ठिकाणी विरोध देखील होत आहे. नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवित असतांना काही मोठ्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले. ही बाब लक्षात येताच इतर छोट्या व्यावसायीकांनी पालिका व पोलीस प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. त्यानंतर या अतिक्रण विभागाने नविन नगर रोडवरील काही मोठ्या अतिक्रमणावर देखील जेसीबी चालवत तेथील अतिक्रमण हटविले. पालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांनी करत शहरातील अवैध अतिक्रमण हटाव मोहीस सुरूच ठेवावी अशी मागणी केली.
दरम्यान जाहीर केलेल्या मोहिमेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याने या मोहिमेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, ‘संगमनेर 2.0’ ही मोहीम शहराच्या विकासातील नवे पर्व ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नगर पालिकेकडून अशा प्रकारची अतिक्रमण हटाव मोहीम अनेक वेळा राबवली जाते. या कारवाईमुळे छोट्या व्यावसायीकांचे प्रचंड नुकसान होते. पालीकेच्या दुर्लक्षामुळे व भेदभाव वृत्तीमुळे काही दिवसांतच महत्वाच्या रस्त्यांवर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे कायमस्वरूपी शिस्त लावण्यासाठी पालीकेकडून या कारवाईत सातत्य ठेवावे अशी मागणी सर्वसामन्य नागरिकांनी केली आहे. थोड्याच दिवसात हे अतिक्रमण परत कुणाच्या आशीर्वादाने होतात याचा शोध नगरपालिकेने घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here