जावेद अलीच्या गाण्यांवर थिरकली तरुणाई

संगमनेरकरांनी दाखवलेली उत्स्फूर्तता आणि घेतलेल्या सहभाग हा आनंद देणारा – जावेद आली

संगमनेर ( प्रतिनिधी ) विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित जयंती महोत्सवात बॉलीवूड मधील आघाडीचा गायक जावेद आली यांनी गायलेल्या कजरारे, वंदे मातरम, पुष्पा मधील श्री वल्ली गाण्यासह विविध गीतांवर संगमनेर मधील तरुणाईने प्रचंड जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.

जाणता राजा मैदानावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात जावेद आली लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे,सौ.कांचनताई थोरात, सौ.दुर्गाताई तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात,राजवर्धन थोरात,मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, सौ.शरयूताई देशमुख, डॉ.हर्षल तांबे आदींसह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जावेद अली लाईव्ह कॉन्सर्टसाठी जाणता राजा मैदानावर तरुणांची अलोट गर्दी होती. जर्मन हँगर मंडपाच्या बाहेरही दोन्ही बाजूला एलडी स्क्रीनची व्यवस्था केली होती संपूर्ण मैदानावर तरुणाईचा एकच जल्लोष होता.

अत्यंत झगमगटात पुष्पा फेम जावेद अलीचे व्यासपीठावर आगमन होताच तरुणाईचा एकच जल्लोष झाला. जावेद आली नाही हिंदी चित्रपट सृष्टीतील तरुणाईच्या ओठावर असलेली एकापेक्षा एक सरस गाणी गायली.

यामध्ये कजरारे कजरारे तेरे काले काले नैना गाण्याला सर्वांनी ठेका धरत साथ दिली. तर पुष्पा मधील श्री वल्ली हे गाणे लागतात सर्वांनी मोठ्या उत्साहाने एकत्रित गाणे गात या गाण्याच्या ठेक्यावर ताल धरला. याचबरोबर सुफी गीतांची मैफिल सादर झाल्यानंतर गायलेले वंदे मातरम ने सर्वांच्या अंगावर शहरी उभे केले.

प्रत्येक गाण्याला तरुणाईचा जल्लोष आणि टाळ्यांचा कडकडाट हेच या लाईव्ह कॉन्सर्ट चे वैशिष्ट्य ठरले.

यावेळी आ.थोरात म्हणाले की, जयंती महोत्सवात सर्व कार्यक्रम दर्जेदार झाले असून जावेद अली हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यक्रम सादर करत असतात तालुका पातळीवर त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम असून या कार्यक्रमातील तरुणांचा आनंद हा मोठा आहे.

तर स्वागतात डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की संगमनेर तालुका हा एक परिवारातून सर्वजण येथे आनंदाने आणि गुण्यागोविंदाने राहतात आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली एक तालुका एक परिवार ही संकल्पना राबवली जात असल्याचेही त्या म्हणाल्या.

तर जावेद आली म्हणाला की संगमनेरचे नागरिक ही अत्यंत कलासक्त कलाप्रेमी आहेत. कार्यक्रमात सर्वांनी दाखवलेली उत्स्फूर्तता आणि घेतलेल्या सहभाग हा अत्यंत आनंद देणार आहे मला पुन्हा नक्की यायला आवडेल असेही तो म्हणाला.यावेळी कीर्ती किल्लेदार यांनी गायलेले मराठी गीतांनाही तरुणांनी मोठी दाद दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख