संगमनेरात वृध्दाची आत्महत्या तर ट्रकखाली चिरडून महिला ठार


अपघाताने बेशिस्त वाहतूकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर-
शहरात आज शनिवारी सकाळी दोन अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारा शहरातील अकोले बायपास रोडवरील श्रमिक मंगल कार्यालयासमोर रस्त्याच्या कडेला असणार्‍या एका छोट्या झाडाला गळफास घेऊन एका 80 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना घडली. सयाजी नामदेव भुजबळ (रा. श्रीरामनगर, संगमनेर) असे या वृद्धाचे नाव आहे. सकाळी सकाळी ही घटना घडल्याने या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली. पोलीसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल होत सदर मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी कॉटेज रूग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान सदर मयत वृद्ध यांना चालता येत नव्हते तसेच त्यांना उभेही राहता येत नव्हते असे बोलले जाते मग ते फाशी घेऊन आत्महत्या कशी करतील अशी शंका यावेळी अनेक जणांनी व्यक्त केली. मयत सयाजी भुजबळ हे शहरातील जुन्या बसस्थानकासमोरील दत्त मंदिराजवळ हार-फुलांचा व्यवसाय करत होते. त्यामुळे ते अनेकांशी परिचित होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.


तर दुसरी घटना आज सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास नाशिक पुणे या शहरातून जाणार्‍या महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ घडली. आपल्या मोपेडवरुन रस्ता ओलांडणार्‍या महिलेला ट्रकची धडक लागल्याने झालेल्या भीषण अपघातात नीतू सोमनाथ परदेशी ही महिला ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाली. मयत महिला नेहरु चौकातील सोमनाथ परदेशी यांच्या पत्नी आहेत.
याबाबत माहिती अशी, मालट्रक (क्र. एम. एच. 20/ ए 5858) बसस्थानकांकडून दिल्ली नाक्याकडे जात होता. हा मालट्रक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आला असता त्याचवेळी रस्त्याच्या दुसर्‍या बाजूने आपल्या मोपेडवरुन रस्ता ओलांडत असताना नीतू सोमनाथ परदेशी (वय 37, रा.पानसरे गल्ली, नेहरु चौक) यांच्या मोपेडला या ट्रकची धडक बसली. त्यामुळे त्यांची मोपेड ट्रक खाली घुसली. अचानक घडलेल्या प्रकारानंतर ट्रक चालकाने ब्रेक लावण्याचाही प्रयत्न केला. मात्र हा ट्रक काही अंतर पुढे गेल्याने पुढील चाकातून वाचलेल्या परदेशी पाठीमागील चाकाखाली सापडून चिरडल्या गेल्या.


या घटनेनंतर आसपासच्या नागरिकांनी धाव घेत जखमी झालेल्या महिलेला तातडीने खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत संगमनेर शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
शहरात दुतर्फा वाढलेले अतिक्रमण, वाढलेल्या वाहनांची संख्या व वाहन चालकांचा बेशिस्तपणा, पोलीसांचे दुर्लक्ष यामुळे अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. बेशिस्त वाहतूकीला लगाम घातला जात नसल्याने यात नागरीकांचा बळी जात आहे. आज एका गृहिनीचा अशा अपघातात बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख