नायलॉन मांजावर बंदी असतांनाही विक्री व वापर

घातक मांजा विक्री व वापरावर कठोर निर्बंध गरजेचे

संगमनेर नगरपालीका हद्दीत नगरपरिषदेच्यावतीने घातक नायलॉन मांजा शोध मोहिम सुरू आहे. सर्व संबंधीत दुकान चालकांना तशा सुचनाही देण्यात आल्या आहे. कोणत्याही दुकानात नायलॉन मांजा विक्रीसाठी सापडल्यास नगरपरिषदेच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येईल.
राहुल वाघ, मुख्याधिकारी संगमनेर, नगरपरिषद संगमनेर

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – सर्वत्र मकर संक्रांत सणानिमित्ताने पंतग उडविण्यासाठी मुले, नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. परंतु, पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणार्‍या पारंपारिक मांजाऐवजी नायलॉन तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रतिबंधित मांजाचा वापर काही जणांकडून केला जात आहे.
या पतंगाच्या मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास धोका निर्माण होतो. पक्षी, प्राणी, नागरीक, बालके, वयोवृद्ध, वाहनस्वार जखमी होण्याचे अथवा प्राण गमाविण्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. तसेच तुटलेला मांजा विजेच्या तांरामध्ये अडकून काही ठिकाणी आगी देखील लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विक्री व वापरावर पोलिसांकडून मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. असे असले तरी शहरातील काही व्यापारी अद्यापही नायलॉन मांजाची विक्री करत आहेे. शहरातील मोकळ्या मैदानात, घराच्या गच्चीवर खेळणार्‍या मुलांच्या हातात हा नायलॉन मांजा आढळून येत आहे. या मांजामुळे ऐन सणासुधीच्या काळात अपघाताच्या घटना घडत आहे व त्यात नाहक काहींना दुखापत अथवा जीव गमविण्याची वेळ येत आहे. त्यामुळे अशा घातक मांजा विक्री व वापरावर कठोर निर्बंध घालणे गरजेचे आहे.
नायलॉन मांजा विक्री व वापरावर या सण काळात पुढील पंधरा दिवस पोलिसांनी मनाई केली आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार आहे. तसेच गुन्हा दाखल केल्यानंतरही मांजाचा वापर व विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून व नगरपालीका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

पशु पक्षांसह संपूर्ण सजीव प्राण्यांसाठी जीवघेणा असलेला नायलॉन मांजा विक्री व वापर यावर बंदी आहे. मात्र ही बंदी झुगारून जर कुणी हा मांजा विक्रीचा किंवा वापरण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी संगमनेर उपविभागात वेगवेगळ्या पथकामार्फत शोध मोहीम सुरू आहे.
सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख