मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

झोळे येथे चिठ्ठी लिहून तरुणाने मांडली व्यथा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्‍न पेटला असताना त्याला ठिकठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी मराठा तरुण टोकाचे पाऊल उचलत आहे. संगमनेर तालुक्यातील झोळे येथेही एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी एक मराठा, लाख मराठा असा उल्लेख करणारी चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना आज मंगळवारी दि.( 31) ऑक्टोबर रोजी पहाटे घडली आहे. सागर भाऊसाहेब वाळे वय (25) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.


याबाबत माहिती अशी की, सागर वाळे हा तरूण झोळे येथे राहात असून तो संगमनेर येथे काम करत आहे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे घरातील सर्व जेवण करून झोपले होते. मंगळवारी पहाटे सागर हा घराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान त्याठिकाणी एक वही सापडली असून त्यामध्ये आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरू नये. आपला लाडका सागर मराठा असा उल्लेख चिठ्ठीत केलेला आहे.
दरम्यान घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील एका तरूणाने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्याचा अंत्यविधीप्रसंगी मोठ्या प्रमाणावर नागरीक उपस्थित होेेते. मयताच्या कुटूंबीयांनी शासनाने भरीव मदत करावी अशी मागणी नागरीकांनी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख