राष्ट्रकुल स्पर्धेसाठी महिला क्रिकेट संघ तयार ; भारत-पाक सामन्याची सर्वाधिक तिकीट विक्री

२८ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत २४ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. क्वालालंपूर येथे १९९८ मध्ये वनडे क्रिकेट खेळले गेले, ज्यामध्ये १६ संघांनी भाग घेतला. त्यात द. आफ्रिका चॅम्पियन बनला होता. या स्पर्धेत प्रथमच महिला टी-२० क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. यंदा ८ संघ सहभागी होतील. या संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात जगातील नंबर-१ ऑस्ट्रेलिया, नंबर-४ भारत, नंबर-७ पाकिस्तान आणि बार्बाडोस तर ब गटात जगातील नंबर-२ इंग्लंड, नंबर-३ न्यूझीलंड, नंबर-५ द. आफ्रिका आणि आठव्या क्रमांकावरील श्रीलंका आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. भारतीय महिला संघाची दावेदारी पाहिली, तर संघाचे उपांत्य फेरी गाठणे जवळपास निश्चित मानले जात आहे. या गटात भारतापुढे एकमेव आव्हान फक्त ऑस्ट्रेलियाचे आहे. त्यांचा पहिला सामना २९ जुलैला आहे.

दोन्ही संघांमध्ये २६ सामने झाले, त्यापैकी भारताने फक्त ६ सामने जिंकले आहेत. फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. भारताचा या स्पर्धेतील दुसरा सामना पाकिस्तानशी होईल. आपला पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे. दोन्ही संघांनी आपापसात ११ सामने खेळले, त्यापैकी ९ भारताने जिंकले आहेत. २०१६ मध्ये भारताचा पाकिस्तानकडून शेवटचा पराभव झाला होता. त्यानंतर भारताने सलग चार सामने जिंकले. त्याचबरोबर, भारत ३ ऑगस्ट रोजी प्रथमच बार्बाडोसशी खेळणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), मानधना, शेफाली, एस. मेघना, जेमिमा, दीप्ती शर्मा, हरलीन, पूजा, तान्या, यास्तिका, राजेश्वरी, मेघना सिंग, रेणुका, राधा यादव, स्नेह राणा.

इंग्लंडने ९२ वर्षांत तिसऱ्यांदा या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन केले. यंदाच्या २२ व्या स्पर्धेत ७२ देशांतील सुमारे ५०५४ खेळाडू सहभागी होतील. भारताचा ३२२ सदस्यीय संघ जात आहे, ज्यामध्ये २१५ खेळाडू आणि १०७ अधिकारी व सपोर्ट स्टाफ यांचा समावेश आहे. स्पर्धेत खेळाडू २० खेळांच्या २८० प्रकारात भाग घेतील. यंदा स्पर्धेतून नेमबाजी आणि तिरंदाजीला बाहेर केले आहे, तर ई-स्पोर्ट‌्सचा प्रदर्शनीय खेळ म्हणून समावेश केला.

राष्ट्रकुल स्पर्धेची १२ लाख तिकिटे विकली गेली आहेत. भारत व पाकिस्तान महिला क्रिकेट संघांच्या सामन्यांच्या तिकिटांना सर्वाधिक मागणी आहे. हा सामना ३१ जुलै रोजी एजबॅस्टन येथे (भारतीय वेळेनुसार) संध्याकाळी ४.३० वाजता खेळवला जाईल. येथे अनेक भारतीय व पाकिस्तानी वंशाचे लोक राहतात. स्पर्धेचे सीईओ इयान रीड म्हणाले, मी क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख