चेअरमन देविदास गोरे यांचे सर्वत्र अभिनंदन
युवावार्ता प्रतिनिधी
संगमनेर – संगमनेर येथील विश्वकर्मा पतसंस्थेला महाबळेश्वर येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात सहकार परिषद 2023 या राज्यस्तरीय कार्यक्रमात पतसंस्था, मल्टी स्टेट पतसंस्था, ग्रामीण, नागरी पतसंस्था यांना ’ सभासदांना सहकार खात्याच्या नियमांप्रमाणे विविध डिजिटल सेवा, योग्य ठेव-कर्ज नियोजन व वसुली ’ या मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रश्नावली च्या आधारे पुरस्कार देण्यात आले, विश्वकर्मा संस्थेला 10 कोटी पेक्षा जास्त ठेवीच्या गटातील पुरस्कार ठाणे जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरद गांगल, गॅलेस्की इन्मा चे अशोक नाईक, बँको मासिकाचे संपादक अविनाश शिंत्रे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था बँका यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेस्की इन्मा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीन दिवस या प्रशिक्षण व पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सहकार खाते व नियामक मंडळ यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करून संस्थांनी जास्तीत जास्त सभासदांना डिजीटल, तत्पर सेवा द्याव्यात असे आवाहन प्रमुख पाहुणे व अभ्यासू व्यक्तींनी केले.
विश्वकर्मा पतसंस्था संगमनेरचे वतीने चेअरमन देविदास गोरे, मा. चेअरमन व विद्यमान संचालक राजेश वाकचौरे, संस्थेचे मॅनेजर अरूण उदमले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्यस्तरीय बँको ब्लु रिबन पुरस्काराने संस्था सन्मानित झाल्याबद्दल विविध स्तरातून संस्थेचे कौतुक होत आहे.