Sunday, March 26, 2023

गुंजाळ कन्स्ट्रक्शनचे विक्रम गुंजाळ यांचे निधन

विक्रम गुंजाळ

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – येथील सिव्हिल इंजिनियर असलेले व शहर विकासाचे अनेक शासकीय कामे उत्कृष्ट पध्दतीने करणारे विक्रम जयराम गुंजाळ यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. मृत्यू समयी ते केवळ 31 वर्षांचे होते. एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व असणारे सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेणारे विक्रम गुंजाळ यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
येथील अमृतवाहिनी इंजिनिरींग कॉलेजमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून सर्वांचा आवडता असणार्‍या विक्रम गुंजाळ यांनी सिव्हिल विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन गुंजाळ कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा तालुक्यात उमटविला होता.

आपल्या कल्पक कामातून विजय घाट, नगरपालिके लगत असणारे आय लव्ह संगमनेर चे बोर्ड, जोर्वे नाका पुलावरील स्वच्छ भारत यामुळे अल्पावधीत संगमनेरमध्ये वेगळी ओळख त्यांनी तयार केली होती. शांत, संयमी असणारे तसेच इंजीनियर असोसिएशनचे सक्रिय सदस्य असणारे विक्रम गुंजाळ हे गेल्या काही दिवसांपासून ब्रेन कॅन्सरने आजारी होते. मुंबई टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. वडीलबंधू अमित गुंजाळ यांनी विक्रम याच्या उपचारासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. मात्र शनिवार 28 रोजी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात आई, मोठे बंधू आणि काँग्रेसचे युवा कार्यकर्ते अमित गुंजाळ, पत्नी, एक मुलगा, भावजय असा परिवार आहे.


सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी शांतिघाट येथे दशक्रिया विधी करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने गुंजाळ नगर मित्र मंडळ, कोल्हेवाडी-कुरण रोड मित्र मंडळ, पावबाकी रोड, गुंजाळ आखाडा, नवले मळा मित्र परिवार, अमृतवाहिनी इंजिनिरींग कॉलेज, इंजिनिअर्स असोसिएशन, काँग्रेस कमिटी, मित्र परिवार, तसेच दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने शोक व्यक्त करत विक्रम गुंजाळ यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

मुळासह प्रवरा नदीतून बेसूमार वाळू उपसा सुरूच

संगमनेर - वाळू तस्करी रोखल्याचा दावा महसूल मंत्री व प्रशासन करत असले तरी संगमनेर शहरातील प्रवरा नदीच्या दोन्ही तीरावर वाळू उपसा...

संगमनेर येथील अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये  राष्ट्रीय पातळीवर “अमृत –फार्माथॉन-२०२३” संशोधन स्पर्धा उत्साहात

अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेर येथे आयोजित केलेल्या “अमृत –फार्माथॉन-२०२३” संशोधन स्पर्धेचे उदघाटन करताना संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, श्री. नरेंद्र...

संगमनेर महाविद्यालयात दिनांक २३ मार्च ला ‘आझाद हिंदची गाथा’ नाट्याचे प्रस्तुतीकरण

युवावार्ता (संगमनेर-प्रतिनिधी) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील एक हजाराहून अधिक विद्यार्थी, कलाकार...

मुळगंगा मातेच्या यात्रा उत्सवास गुरुवारपासून प्रारंभ

युवावार्ता (संगमनेर प्रतिनिधी)तालुक्यातील चंदनापुरी येथील जागृत देवस्थान श्री मुळगंगा मातेच्या यात्रा उत्सवास गुरुवार दिनांक 23 मार्च पासून...