डीजेच्या गाडीखाली चिरडले वराती

दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी, विवाह सोहळ्यावर शोककळा

आमदार थोरात हे पक्षाच्या कामानिमित्त दिल्लीत असतांना त्यांना माहिती समजाताच त्यांनी तातडीने आपल्या यंत्रणेला या सर्व दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर कार्यकर्ते व नागरीकांनी दुर्घटनाग्रस्तांना तातडीने संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. या जखमींची आ. बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात यांनीही आस्थेवाईकपणे चौकशी केली. यशोधन कार्यालयाकडून सर्व वैद्यकीय मदतीसाठी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी सर्वतोपरी मदत केली.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – डीजेच्या तालात वराती नाचत असताना अचानक चालकाचा ताबा सुटून ही डीजेची गाडी तीव्र वेगाने डीजेच्या समोर नाचणार्‍या वरातींच्या अंगावर आल्याने भिषण दुर्घटना घडली. यात दोन जणांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना गुरूवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास नवरदेव हळदीसाठी नवरीच्या घरी जातांना तालुक्यातील धांदरफळ खुर्दमध्ये घडली.


याबाबत समजलेली माहिती अशी की, धांदरफळ खुर्दमधील एका तरुणाचे आज शुक्रवारी (दि.05)लग्न आहे. या लग्नासाठी नवरदेव नवरीच्या घरी हळदीसाठी जात होता. सायंकाळी साधारण साडेचार वाजेच्या सुमारास खताळ परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्र परिवार, ग्रामस्थ नवरदेवाची डीजेच्या ताला- सुरात पाठवणी करत असताना चालकाडून ब्रेक ऐवजी ऐक्सलेटर दाबल्याने हा डिजे थेट वरातीत घुसला. त्यामुळे वरातीत नाचणारे व सोबत चालणारे या डिजेखाली सापडले. अचानक घडलेल्या या घटनेमध्ये सहा जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शहरातील मेडिकव्हर हॉस्पिटल व धन्वन्तरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु भास्कर राधू खताळ (वय 65) व बाळू हरीभाऊ खताळ (वय 35) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सहा जणांवर उपचार सुरू आहेत.
किसन रंगनाथ खताळ यांच्या मुलाचे शुक्रवारी रणखांब येथे लग्न आहे. त्यासाठी (क्र. एम. एच16/ए.ई.2097) या क्रमांकाचे वाहन डीजे म्हणून आणले होते.आनंदाने नाचणार्‍या आणि बेसावध असलेल्या वर्‍हाड्यांना काही समजण्यापूर्वीच या डीजेच्या वाहनाखाली वराडी चिरडले गेले. या दुर्दैवी घटनेत रामनाथ दशरथ काळे, गोरक्ष पाटीलबा खताळ, सोपान रावबा खताळ, भारत भागा खताळ व सागर शंकर खताळ, अभिजीत ठोंबरे हे सहाजण जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेने धांदरफळ, रणखांबसह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी डीजे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख