आ. पी. एन. पाटील – सडाेलीकर शाहू महाराजांचे खरे वारसदार

स. भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्था पुरस्कृत सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार प्राप्त

उद्योगी माणसाचा सदरा घालावा म्हणतात. त्यांचा सहवास लाभावा, असे अनेकजन सांगतात. म्हणूनच आम्ही आमदार श्री. पी. एन. पाटील साहेबांच्या सहवासात आलो. ही व्यक्ति सतत कामात, उद्योगात असते. कष्ट, कष्ट आणि कष्ट घेतात, कमी बोलतात व जास्त काम करतात. म्हणूनच लोक त्यांची संगत करतात.
उद्योगी माणसाला वेळ अपुरा पडतो. काही लोकांना वेळ जात नाही, परंतु येथे तसे नाही. वेळ कमी पडतो आहे. समाजकारण, राजकारण, उद्योग, सहकारी संस्था, शेती आणि इतर कार्यात पी. एन. पाटील सतत मग्न असतात म्हणून ही व्यक्ती सर्वांना आवडते. श्री. पांडुरंग निवृत्ती पाटील हे नाव त्यांचे. त्यांच्या नावातच पांडुरंग आहे. म्हणजे नाव पांडुरंग व आडनाव पाटील आहे. लोकहो हा पांडुरंग गरीबाना पावतो. शेतकर्‍यांना पावतो. कष्टकर्‍या माणसाला पावतो म्हणून ही व्यक्ती प्रत्येकांच्या मनात घर करून बसली आहे.
काँग्रेस पक्षासाठी अहोरात्र झटणारे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून आमदार श्री. पी. एन. पाटील यांच्याकडे पहातात. ज्या ज्या ठिकाणी पी. एन. पाटील आहेत तेथे तेथे विश्‍वास, गुणवत्ता, प्रगती, विकास, काँग्रेस असेच समिकरण केलेले आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. आमदार श्री. पी. एन. पाटील साहेबांच्यावर ज्या प्रकारचा विश्‍वास लोकांचा आहे त्या प्रकारचा विश्‍वास आणि निष्ठा फक्त थोड्या राजकीय नेत्यावर असलेला दिसून येतो. साहेबांनी संधीचे सोने केले हे याचे कारण आहे.


महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचे निष्ठेने, प्रामाणिकपणे, जिव्हाळ्याने, धाडसाने काम करणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. यामध्ये वरच्या क्रमांकावर आमदार श्री. पी. एन. पाटील- सडोलीकर आहेत. उद्योग, शेती, सहकार, समाजकारण, राजकारण या क्षेत्रामध्ये पी. एन. साहेबांनी भरघोस यश मिळविलेले आहे. गावगावच्या ग्रामपंचायत, दूध संस्था, सेवा संस्था, पाणी संस्था, पतसंस्था, तरुण मंडळे, शिक्षण संस्था यांच्यातील लोकांशी असणारे नाते मोठ्या विश्‍वासाचे आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचे यशस्वी संघटक म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमदार श्री. पी. एन. पाटील-सडोलीकरांचे नाव झालेले आहे. आपल्या जीवा-भावाच्या कार्यकत्यांना एकत्र करून विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सोनिया गांधी यांच्या दौर्‍याचे संपूर्ण नियोजन केले होते. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदार, खासदार, जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती व सर्व ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी जमले. याशिवाय सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव भागातून जनसमुदायचे ताफेच्या ताफे एकत्र आले होते. दोन महिन्याच्या परिश्रमानंतर सोनियाचा दिवस उगवला आणि सात लाख जन समुदाय व कार्यकर्त्यांमध्ये असलेले चैतन्य, स्वागत कमानी, मोठमोठे बॅनर, कटाऊटस्, तिरंगी झेंडे प्रचंड समुदायात सोनियाजींना अभिवादन असा नेत्रदिपक सोहळा पाहून काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी भारावून गेल्या. संपूर्ण दौर्‍याबाबतचे समाधान झाले. संयोजकांना धन्यवाद दिले. सोनिया गांधींचा कोल्हापूर दौरा म्हणजे काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मिळालेली नवसंजीवनीच होय. सर्वत्र वातावरण नवचैतन्याचे बनलेले होते.
राजकारणात आणि समाजकारणात विचाराने व मनाने श्रीमंत असणारे आमदार पी. एन. पाटील आहेत. दिलेला शब्द पाळणे, त्याचा पाठपुरावा करताना गटातटाचा विचार न करणे ही त्यांची खास अशी स्वभावशैली आहे. आपल्या कर्तृत्वाने उत्तुंग बनलेले ते एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, ही भूमिका सातत्याने ठेवली आहे. म्हणूनच अनेक वर्षे ते यशस्वी नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या एकूण कामामध्ये मैत्री हा भाग पक्ष्याच्या बंधनात अडकून पडला नाही. त्यामुळे त्याचे सर्वसमावेशक नेतृत्व तयार झाले. समाजाचे काम शेतकर्‍याचा मुलगा मोठ्या कटाने करीत आहे, याचा आनंद सर्वांना झाला.


निवडणुका या पाच वर्षानंतर येतात पण जनतेची कामे ही दररोजचीच असतात. त्यामुळे साहेबांनी सर्वसामान्यांच्या कामाचा जास्त विचार केला. यश-अपयशाने साहेब डगमगले नाहीत. कधीही खचले नाहीत. हाच त्यांचा खरा विजय आहे. काँग्रेस पक्षाच्या बळकटीला युद्ध पातळीवर नियोजन करून काम केले. प्रचार व प्रसार जोमाने केला. घरोघरी आपल्या काँग्रेस पक्षाचे नाव घेतले पाहिजे, अशी कामाची पद्धत ठेवली. सर्वसामान्यांची कामे मार्गी लावली. जर प्रजा सुखी तर राजा सुखी असे समीकरण झाले.
देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत रहावे । घेणार्‍याने देणार्‍याचे एके दिवशी हातही घ्यावेत ॥
शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आमदार पी. एन. पाटील यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. जास्त प्रमाणात यश आले. अजूनही लढाई संपलेली नाही.
कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद आमदार श्री. पी. एन पाटील-सडोलीकर म्हणजे काँग्रेस, निष्ठा संघटनात्मक बांधणी, गांधी-नेहरू आणि काँग्रेसवर प्रेम, विश्‍वास असल्याने गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर कामाचा डोंगर उभा केला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून आणि तालुक्याच्या प्रत्येक गावातून याशिवाय लोकप्रतिनिधी यांनी आमदार श्री. पी. एन. पाटील यांची सन 1999 साली कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बहुमताने निवड केली. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांनी पी. एन. पाटील साहेबांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपविली होती. काँगेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना संघटनात्मक पातळीवर ही जबाबदारी काँगेस श्रेष्ठनी सोपविली. पी. एन. पाटील सोहबांनी सर्वांना बरोबर घेऊन बीस वर्ष ती पेलली. हे सतीचे वाण स्विकारून काँग्रेसला चांगले दिवस आणले. त्याच्यामुळे सामान्य कार्यकत्यांचे मनोबळ वाढलेले आहे. या काळात झालेल्या बेगवेगळ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळविलेले आहे. काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाची मूलतत्त्वे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, तालुक्यातील प्रत्येक गावात, गावातील प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येक माणसापर्यंत पोहचविण्याचे महान कार्य आमदार श्री. पी. एन. पाटील-सडोलीकर यांनी आपल्या शेकडो, हजारो, लाखो कार्यकर्त्यांमार्फत केलेले आहे. याची प्रचीती सर्वांनाच आली आहे. काँग्रेसच्या विचाराचा ग्रामीण भागात प्रसार करून काँग्रेस पक्षाबाबत असणारी सर्वसामान्य लोकांच्या मनातील मरगळ साहेबांनी दूर केली. त्यामुळे ग्रामीण भागातील काँग्रेसबाबत उत्साहाचे वातावरण पी. एन. साहेबांच्यामुळे झालेले आहे. काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे आणि तत्त्वेचे प्रत्येक माणसाच्या मनात बिंबवण्यासाठी पी. एन. साहेबांनी अविश्रांत कष्ट घेतलेले आहेत. आणि आजही घेत आहेत. कार्यकत्यांच्या बरोबर मोकळेपणाने वागतात. त्यामुळे साहेब प्रत्येकाला आपले वाटतात. साहेबांचे राजकीय व सामाजिक जीवन स्वच्छ अगदी धुतल्या तांदळाप्रमाणे आहे. त्यांचा निःस्वार्थी व निगर्वी स्वभावच त्यांना यश मिळवून देत आहे. कोणत्याही संस्थेचा अथवा सार्वजनिक कामाचा कारभार चोख ठेवतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे नव्हे ही तर त्यांची खासियत झाली आहे.
कोल्हापूरच्या सहकारातील दीपस्तंभ काँग्रेस पक्षाचे निष्ठावान नेते आ. पांडुरंग निवृत्ती उर्फ पी. एन. पाटील यांना सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार मिळाल्याबद्दल दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन !

संकलन – मा. प्रा. डॉ. दिनकर पाटील,
भोगावती महाविद्यालय, कुरूकली,
ता. करवीर, जि. कोल्हापूर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख