आत्तापर्यंत कधीही न अनुभवलेला, अभूतपूर्व आनंद

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर येथे हॅपिनेस कोर्स सुरु

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
संगमनेर येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, कॉलेज रोड, संगमनेर येथे आज मंगळवार दि. 8 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2023 पर्यंत हॅपिनेस कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 6.00 ते 8.30 आणि संध्याकाळी 6.30 ते 9.30 अशा दोन बॅचमध्ये हा कोर्स असून कुठल्या ही एकच बॅचला आपल्याला हा कोर्स अनुभवता येणार आहे. या शिबीरामध्ये प. पू. गुरूदेव श्री श्री रविशंकरजी सदस्यांबरोबर थेट संवाद साधणार असून सर्व साधंकांना परमपूज्य गुरूदेवांशी संवाद करण्याची संधी मिळणार आहे. 140 हून अधिक देशांमध्ये 80 कोटीहून अधिक लोकांनी अनुभवलेली अद्भूत अशी सुदर्शन क्रिया येथे शिकवली जाणार आहे.

kajale


हॅपिनेस कोर्सचा मुख्य भाग म्हणजे अतिशय प्रभावी आणि खास अशी श्‍वासप्रक्रिया : सुदर्शन क्रिया. शरीर, मन आणि आत्मा यांच्यामध्ये नैसर्गिक लय प्रस्थापित करणारे प्रत्यक्ष साधन म्हणजे सुदर्शन क्रिया. सुदर्शन क्रियेने लक्षावधी लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे. सुदर्शन क्रियेचे वैशिष्ट्य तिच्या निर्मितीतही आहे. गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांना दहा दिवसांच्या मौनानंतर सुदर्शन क्रिया प्राप्त झाली. आजपर्यंत कधीही न मिळालेला आनंद या कोर्समधून अनुभवायला मिळणार आहे. सुदर्शन क्रियेसोबतच इतर प्राणायामाचे प्रकार, योगासने, ध्यान या कोर्सधील चर्चा सत्रात शिकवल्या जाणार आहेत.


पाण्यात पडल्याशिवाय पोहण्याचा अनुभव घेता येत नाही त्याप्रमाणे हॅपिनेस कोर्समध्ये भाग घेतल्याशिवाय जीवनाचा आनंद घेता येणार नाही. हॅपिनेस प्रोग्रॅमचे प्रशिक्षक साधकाना प्रत्येक चरणावर अतिशय सहजपणे मार्गदर्शन करतील. वय, पार्श्‍वभूमी आणि शारीरिक तयारी या पैकी कशाचाही विचार न करता, कोणीही हॅपिनेस कोर्सचा तरल अनुभव घेऊ शकतो.
फक्त काही तासांच्या हॅपिनेस कोर्स मध्ये जे काही शिकवले जाते ते सर्व (तंत्र, प्रक्रिया, प्रत्यक्ष करण्याच्या गोष्टी) साधक सहजपणे अवगत करू शकता. तुम्ही अगदी शांत, मनमोकळे, निरोगी, अधिक सज्ञान आणि आनंदी व्यक्ती होऊन घरी परतता, तेही सर्व फायदे आयुष्यभर टिकवण्यासाठी, आवश्यक ती सर्व आणि सहज करण्यासारखी तंत्रे शिकूनच. आनंदी मन साधकाला शांती, अधिक चांगली निर्णयक्षमता देते आणि एकूणच जीवनाची गुणवत्ता वाढवते. या कोर्समुळे शारीरिक ऊर्जा व कार्यक्षमता वाढते. मन आनंदी राहते. चांगली निद्रा व आराम मिळतो. व्यसनापासून मुक्ती, शारिरीक व मानसिक ताणतणाव दूर होतात, कोलेस्ट्रॉल मध्ये संतुलन व रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होते. चिंता, भय व अनेक विचारांपासून मुक्ती, मन: शांती मिळते, शारिरीक आजार बरे होऊन शरीर निरोगी राहते.


थोडासा आनंददेखील आपले जीवन कसे बदलून टाकते हे या कोर्समधून अनुभवण्यास मिळणार आहे. सकाळ व संध्याकाळच्या बॅचसाठी रजिस्टेशन लिंक रेश्रीं .ळप/720935 व फॉर्म मिळण्यासाठी न्यू राम फोटो स्टुडिओ, केसेकर कॉम्पलेक्स (मो. 9422740163) व श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, विजय नागरी पतसंस्था मागे कॉलेज रोड (मो. 9923799851) येथे उपलब्ध आहे.या हॅपिनेस कोर्सचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वाती शाह (मो. 9923799851), वैशाली गोडसे, डॉ. निकिता नवले, संजय भागवत (मो. 942274016, सुभाष वारूंक्षे, सखाहारी वर्पे यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख