वेल्हाळेमध्ये दुर्दैवी घटना

भिंत कोसळून चिमुकलीसह चुलत्याचा मृत्यू

भिंत कोसळून चिमुकलीसह चुलत्याचा मृत्यू

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यातील वेल्हाळे गावात शुक्रवारी रात्री एक दुर्दैवी घटना घडली. रात्री 8.30 च्या सुमारास कुटुंब जेवण करत असताना घराच्या भिंतीवरील वरांडी कोसळल्याने त्याखाली दबून आठ वर्षीय चिमुकलीसह तिच्या चुलत्याचा मृत्यू झाला तसेच या अपघातात तिची आजी गंभीर जखमी झाली. या घटनेने परिसरात प्रचंड हळहळ व दुख: व्यक्त केले जात आहे.
या बाबत माहिती अशी की, वेल्हाळे येथे प्रगतशील शेतकरी असणारे लक्ष्मण चंद्रभान सोनवणे (वय 42) हे आपले भाऊ एकनाथ सोनवणे सह संपूर्ण परिवार एकत्र राहतात.

दरम्यान त्यांनी काही वर्षापूर्वी आपल्या घरामध्ये दुरूस्तीचे काम करून बांधकाम वाढविले होते. काल शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास सर्व कुटुंब जेवण करीत असताना अचानक स्वयंपाक घराच्या भिंतीवर वरांडी कोसळली. त्यामुळे या सिमेंट विटांच्या पक्या भिंतीखाली दबून लक्ष्मण चंद्रभान सोनवणे व त्यांची आठ वर्षीय पुतणी सानिका एकनाथ सोनवणे, लक्ष्मण सोनवणे यांची आई वैजंताबाई हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी संगमनेर येथे आणण्यात आले. मात्र लक्ष्मण चंद्रभान सोनवणे व सानिका एकनाथ सोनवणे यांचा उपचारादरम्यान या दुदैवी अपघातात मृत्यू झाला.


सोनवणे परिवार येथील प्रगतशील शेतकरी असून गावातही मोठा दबदबा आहे. सामाजिक धार्मिक कार्यात हा परिवार सहभागी असायचा. मात्र या दुर्दैवी घटनेने वेल्हाळेसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आज सकाळी चुलता पुतणीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख