कार अपघातात दोन ठार , दोन जखमी – चालकाला डुलकी लागल्याने कार पुलाला धडकली

कार अपघातात

संगमनेर (प्रतिनिधी)
पुण्याहून संगमनेरच्या दिशेने येत असलेल्या वॅगनार कार चालकाला डुलकी लागल्याने ही कार पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एका महिलेसह दोन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी शिवारातील आनंदवाडी येथे गुरीवारी मध्यरात्री घडला.

नाशिक -पुणे महामार्गावरून पुण्याहून संगमनेरकडे वॅगनार कार क्रमांक एमएच 17 सीएम 3855 मधून चार जण प्रवास करीत होते. दरम्यान मध्यरात्री कार चालक राधाकृष्ण मोरे यांना डुलकी लागल्याने आनंदवाडी शिवारातील एका छोट्या पुलाला ही कार जाऊन धडकली. या भीषण धडकेत कारमधील मनिषा अशोक थोरात, सागर दाभाडे (रा. कोपरगाव) हे दोघे जागीच ठार झाले. तर कार चालक राधाकृष्ण मोरे, अजय अशोक थोरात हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी संगमनेर येथील मेडीकव्हर हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले.


दरम्यान महामार्गावर अपघात झाल्याचे समजताच डोळासणे व संगमनेर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री प्रवास करतांना चालकाला डुकली लागल्याने हा भीषण आपघात झाला आहे. याबाबत अधिक तपास तालुका पोलीस करत आहे.
दरम्यान वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे असे अपघात अनेक वेळा होत असल्याने वाहन चालवितांना झोप लागल्यास वाहने थांबवून घ्यावीत असे आवाहन पोलीस करत असतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख