पिकअप – रिक्षाच्या धडकेत दोन ठार, तीन गंभीर जखमी

अपघातात

अपघातात दोन्ही वाहनांसह एका स्विफ्ट कारचेही मोठे नुकसान

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – भरधाव वेगाने जाणार्‍या पिकअपने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी तर एका महिलेसह दोन जण ठार झाल्याची घटना काल सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. नाशिक-पुणे महामार्गावरील खांडगाव फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला. या अपघातात दोन्ही वाहनांसह एका स्विफ्ट कारचेही मोठे नुकसान झाले.


या अपघाताबाबत समजलेले अधिक माहिती अशी की, काल सोमवारी रात्री दहा वाजता नाशिक-पुणे महामार्गावरून एमएच 17 सीव्ही 0026 या क्रमांकाची पिकअप कार संगमनेरहन पुण्याच्या दिशेला जात होती. ही पिकअप खांडगाव फाट्याजवळ आली असता पिकअपने समोरून जाणार्‍या रिक्षाला (क्रमांक एमएच 12 टीयु 3310) जोराची धडक दिली. या रिक्षामधील प्रवासी पुणे येथील असून ते एका लग्नासाठी संगमनेरला आलेले होते. जोरदार धडकेमुळे या अपघातात रिक्षा व पिकअप पलटी झाली. त्यामुळे रिक्षात बसलेले सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले. यात जखमींमध्ये दत्ता पांडुरंग वराडे, कैलास चोथे, आशा चोथे, राजू शेळके यांचा समावेश आहे. दरम्यान याचवेळी समोरून जाणार्‍या स्विफ्ट कारलाही (क्रमांक एमएच 12 केजे 1183) पिकअपची धडक बसली. या धडकेत कारचे नुकसान झाले.


अपघाताची माहिती समजताच नागरिक घटनास्थळी जमा झाले. सामाजिक कार्यकर्ते दिगंबर गुंजाळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपप्रमुख अभिजीत घाडगे, अनंत गुंजाळ व नंदकिशोर गुंजाळ आदींनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी सहकार्य केले. याबाबत शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. अपघाताची माहिती समजतात शहर पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल एकनाथ खाडे, चालक सुरेश गोलवड हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने रुग्णवाहिकेस पाचारण केले. अपघातातील जखमींना त्वरित शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या अपघातात आशाबाई बबनराव चोथे (वय 45, रा. आंबाईमाता मंदिर, पुणे), राजेंद्र उत्तम शेळके (वय.45 रा. आंबेगाव, पुणे) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख