संगमनेरातील दोन सराईत गुन्हेगार तडीपार

waghchaoure

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पाेलिसांची कठाेर भूमिका

कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. वारंवार गुन्हे करणारे किंवा गुन्ह्यासाठी जबाबदार असणार्या गुन्हेगारांची कुंडलीच पोलिसांनी तयार केली आहे. या कुंडलीचा क्रम ठरवून त्यांची यादी तयार करून अशा गुन्हेगारांना तडीपार करण्यासाठी वेगाने अहवाल बनवून वरिष्ठांना सादर केले जात आहे. वरिष्ठांकडून देखील यावर तातडीने निर्णय घेण्यात येत असल्याने अशा गुन्हेगारांना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केले जात आहे. ही यादी मोठी असून आणखी बर्याच जणांना तडीपारीच्या नोटिसा लवकरच बजावण्यात येणार आहे.
सोमनाथ वाघचौरे (डिवाएसपी, संगमनेर)

संगमनेर उपविभागात गुन्हेगारीचे प्रमाण व स्वरूप झपाट्याने वाढले आहे. अवैध धंदे व दादागिरी, दहशत निर्माण करणे, हाणामारी करणे, सामाजिक शांतता भंग करणे अशा वाढत्या घटनांच्या पाश्वभूमीवर पोलीस विभाग देखील आक्रमक झाला आहे. सामाजिक शांतता धोक्यात आणणार्या अशा गुंड प्रवृत्तीच्या व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांची यादीच तयार करून त्यांना या शहराबाहेर, तालुका, जिल्ह्याबाहेर हाकलून देण्याचा मोठा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. काल गुरूवारी संगमनेर उपविभागातील तब्बल 23 जणांना काही कालावधीसाठी संगमनेर व अकोले तालुक्याबाहेर हकलून देण्यात आले आहे. तर आज शुक्रवारी दोन सराईत गुन्हेगारांना सहा महिने व एक वर्षासाठी अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका व पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका येथून तडीपार करण्यात आले आहे. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
सध्या लोकसभा निवडणूका त्याचबरोबर अनेक सण-उत्सव साजरे होत आहे. अशा परिस्थितीत शहर व तालुक्यात शांतता रहावी, कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य घडू नये यासाठी पोलीसांनी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या दोन जणांना तडीपार करण्यात आले आहे. कासिम असद कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) याच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, जबर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, जीवे मारण्याची धमकी देणे, अल्पवयीन मुलीला पळवून नेणे, प्राण्यांची कत्तल करणे अशा स्वरूपाचे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तब्बल 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे कासीम कुरेशी याच्यावर उपविभागीय पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला असून त्याला अहमदनगर जिल्हा, नाशिकमधील सिन्नर व पुणे जिल्ह्यातील जुन्नर मधून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. तर दुसरा आरोपी इसमाईल निसार पठाण (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर) याच्यावर देखील वरील प्रमाणे संगमनेर शहर पोलीस ठाण्याात 4 गंभीर गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर देखील कडक कारवाई म्हणून नगर, नाशिकमधील सिन्नर, पुणेमधील जुन्नर तालुक्यातील सहा महिन्यांकरीता हद्दपार करण्यात आले आहे. या कामगिरीसाठी शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या सहकार्याने हा प्रस्ताव पोलीस अधिक्षक राकेश ओला यांना पाठविण्यात आले होते. त्यावर तात्काळ निर्णय झाल्याने वरील दोन्ही आरोपींना तडीपार करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख