चमत्कार घडणार, जिल्ह्यातील दोन्ही जागा आघाडी जिंकणार – आ. थोरात

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – महाराष्ट्राचे राजकारण सध्या महायुती व महाविकास आघाडी यातील विविध पक्षांच्या एकत्रीकरणामुळे पूर्ण बदलेले आहे. एकमेकांच्या विरोधात बसणारे आता एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातही यापेक्षा काही वेगळे चित्र नाही. अहमदनगर लोकसभेत विखे-लंके सामना चांगला रंगात आलेला असताना आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी मोठे राजकीय सूतोवाच केले आहे. राज्यातच नव्हे, तर देशातील राजकारण बदलले आहे. महाविकास आघाडी राज्यात चमत्कार घडवेल. जिल्ह्यातील अहमदनगर आणि शिर्डी या लोकसभेच्या दोन्ही जागा महाविकास आघाडी मोठ्या मताधिक्याने जिंकेल. नक्कीच चमत्कार घडेल असे ते म्हणाले. आ. थोरात म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे षडयंत्र भाजपकडून केले जात आहे. विकासाच्या नावाने बोंबाबोंब असताना निव्वळ धर्माच्या नावाखाली भावनिक राजकारण करून सत्ता मिळविण्याचे काम भाजपने केले आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल. जिल्ह्यातील निवडणूक, तर लोकांनीच हातात घेतली आहे. त्यामुळे ही लाट भाजपला थोपविता येणार नाही.

जिल्ह्यात ना. विखेंची प्रतिष्ठा पणाला

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – अहमदनगर जिल्हा राज्यातील सहकाराचा प्रमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात सहकारामुळे अनेक घराणे मोठे झाले. विखे, थोरात, काळे, कोल्हे, राजळे, आदिक, कर्डिले, जगताप, पाचपुते, गडाख असे अनेक घराण्यांनी राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले. यात विखे घराण्याचा कायमच राजकारणात मोठा दबदबा राहिला आहे.
राजकारणात नेहमी प्रवाहात राहाणारे व कायम सत्येच्या जवळ राहणारे विखे यांचा आजही राजकारणात मोठा दबदबा आहे. काळाची पावले ओळखत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आज महसूल सारखे महत्वाचे मंत्री पद पटकावले आहे. त्यांच्या या पदाबरोबरच भाजपने त्यांच्यावर नगर जिल्ह्यातील दोन्ही जागांची जबाबदारी सोपविली आहे. दक्षिण नगरमधून विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे स्वत: उमेदवारी करत आहे. तर शिर्डीमधून महायुतीचे उमेदवार सदाशीव लोखंडे यांना निवडूण आणण्याची जबाबदारी पार पाडतांना दिसत आहे. दरम्यान बदलले राजकीय समीकरण, विरोधकांनी केलेली एकजूट आ. निलेश लंकेंनी उभे केलेले आवाहन यामुळे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जिल्ह्यात मोठा जोर लावावा लागत आहे. भाजपचे स्टार प्रचारक असले तरी त्यांनी सध्यातरी जिल्ह्यातील दोन्ही जागांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. विरोधकांची एकी फोडणे, दुरावलेले सहकारी पुन्हा जमा करणे, भाजप बरोबर मित्र पक्षांशी सलोखा ठेवणे यासाठी ना. विखे कसरत करतांना दिसत आहे. जिल्ह्यातील दोन्ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी असल्याने व आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी त्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख