संगमनेरात महात्मा फुले जयंती व रमजान ईद उत्साहात साजरी

0
1376

आ. बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवरांनी महात्मा फुलेंना अभिवादन करत दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी सर्वप्रथम शेतकरी, शोषित, वंचित यांच्या प्रश्नांना वाचा फोडून समतेसाठी लढा दिला. प्रत्येक माणूस हा समान असून त्यांनी जगाला समतेचा व मानवता धर्माचा विचार करून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अशा या थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती संगमनेरात उत्साहात साजरी करण्यात आली. त्याचबरोबर रमजान ईद हा पवित्र सण एक महिन्याच्या उपवासानंतर येतो. मुस्लिम बांधव मोठ्या आनंदाने हा सण साजरा करत असतात. एकता ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असून रमजान ईद हा बंधुभावाचा संदेश देणारा सण आहे. हे दोन्ही उत्सव मोठ्या आनंदात पार पडले. यानिमित्त काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवरांनी महात्मा फुले यांना अभिवादन करत रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.


माळीवाडा येथील महात्मा फुले स्माराकाला विविध मान्यवरांनी अभिवादन केले. तर शहरातील ईदगाह मैदान त्याचबरोबर वेगवेगळ्या मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पाडून एक-दुसर्‍यांना शुभेच्छा दिल्या. मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, आ.सत्यजित तांबे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात, गणेश मादास, सोमेश्वर दिवटे, नितीन अभंग, गजेंद्र अभंग, निखिल पापडेजा ,गौरव डोंगरे, अतुल अभंग, शकील पेंटर, लाला बेपारी, जावेद शेख अभय खोजे, महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कन्हैय्या मंडलीक, कार्याध्यक्ष बाळासाहेब माताडे, सचिन पावबाके, वैभव अभंग, उपाध्यक्ष प्रसाद काठे, श्रीनाथ गाडेकर, सचिव नितीन ढोले, सुदर्शन पावबाके, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here