संगमनेर मर्चंट बँकेचा ७०० कोटींचा टप्पा पार

1 एप्रिल पासुन मोफत ऑनलाईन RTGS/NEFT सेवा ही केली सुरु

ढोबळ नफा 10 कोटी 41 लाख

महाराष्ट्रातील आठ जिल्यात कार्यरत असलेली व अहिल्यानगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करणारी व टेक्नोसॅवी सहकारी बँक म्हणून ओळखली जाणारी नागरी सहकारी बँक “दि.संगमनेर मर्चंटस बँक” ही सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेत 1966 पासून कार्यरत आहे. 59 वर्षापासून सर्वसामान्यांना अर्थ व बँकिंग सेवा देणाऱ्या बँकेने आर्थिक वर्षात 2023-2024 मध्ये मार्च 2024 अखेर 700 कोटीचा बँकिंग व्यवसाय टप्पा पूर्ण केला आहे. त्याचबरोबर सलग 3 वर्षे नेट NPA शून्य व ग्रॉस NPA 5 % पेक्षा खाली ठेवण्याचा विक्रम केलेला आहे व नेट प्रॉफिट रु.6 कोटी 86 लाख मिळवण्यात बँक यशस्वी झालेली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात आर्थिक अस्थिरता, औद्योगिक क्षेत्रात मंदीची लाट, गुंतवणुकीवर व्याज दरामध्ये सातत्याने होणारी घट अशी स्थिती असताना देखील बँकेचे विद्यमान चेअरमन श्री संतोष करवा यांच्या नेतृत्वाखाली बँकेने आर्थिक प्रगतीमध्ये सातत्य ठेवून 31 मार्च 2024 अखेर बँकेचा नेट NPA 0% केलेला आहे. सध्या बँकेच्या 9 शाखा असून संगमनेर येथील मुख्य कार्यालय इमारत ही स्वमालकीची प्रशस्त जागा आहे. बँकेच्या प्रत्येक शाखेत ATM सुविधा उपलब्ध असून मुख्य शाखेत 3 ATM ग्राहकांच्या अखंड सेवेसाठी उपलब्ध करून दिलेले आहे.


बँकेने अद्यावत कोअर बँकिंग सोल्युशनचा अवलंब केलेला असून सर्व शाखा संगणीकृत व अद्यावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा कार्यरत आहे. बँकेने ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक सुविधा देण्यावर भर दिलेला असून ऑनलाईन मोबाईल बँकिंग द्वारे RTGS/NEFT/IMPS व छोटे छोटे पेमेंट साठी तसेच व्यापाऱ्यांना अत्यंत उपयोगी असलेले UPI सेवा सुद्धा बँकेने सुरू केलेल्या आहे.
रिझर्व बँकेच्या आर्थिक दृष्ट्या सक्षम उत्तम संचलित (FSWM) निकष बँकेने पालन केलेले आहे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या च्या निकषानुसार बँक सायबर सेक्युरीटीच्या LEVEL-2 चे निकष पूर्ण
केले आहे. साल 2023-24 या काळासाठी संचालक मंडळांनी बँकेचा कणा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या कुटुंबाच्या हिताच्या दृष्टीने प्रत्येक कर्मचाऱ्यांस व त्यांच्या कुटुंबातील सदस्यास रु.3 लाखाची फ्लोटर आरोग्य विमा पॉलिसी, रु.5 लाखा अपघात विमा तसेच बँकेच्या 70 वर्ष वयापर्यंत प्रत्येक सभासदाची रु.5 हजार आरोग्य विमा बँकेने घेतला आहे.
बँकेकडे 31 मार्च 2024 अखेर रु. 431 कोटी 19 लाख रु च्या ठेवी असून रु.279 कोटी 73 लाख रु चे कर्ज वाटप केले आहे.त्यामुळे विक्रमी रु.700 कोटीचा बँकिंग व्यवसाय टप्पा
पूर्ण केला आहे. तसेच रु.179 कोटी 91 लाख रु ची गुंतवणूक आहे.बँकेचे खेळते भांडवल 496 कोटी 96 लाख असून नेटवर्थ 45 कोटी झाली आहे. बँकेने मिळविलेल्या 10 कोटी 41 लाख ढोबळ नफ्यामधून 2 कोटी 38 लाख इन्कम टॅक्स,व 1 कोटी 17 लाख रु च्या कायदेशीर तरतुदी आर्थिक वर्षात करून “रु.6 कोटी 86 लाख” निव्वळ नफा मिळविल्याचे बँकेचे व्हा चेअरमन श्री प्रकाश कलंत्री यांनी सांगितले.
छोट्या व्यापाऱ्यांसाठी छोटे व्यापारी कर्ज योजना सुरु केलेल्या आहे. या शिवाय प्रायोरिटी कर्ज योजना,शेती गोल्ड लोन,अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अश्या विविध कर्ज योजना सुरु लेल्या आहे. त्यामध्ये बँकेचे अध्यक्ष श्री संतोष करवा व सर्व संचालक मंडळ , मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व कर्मचारी वर्ग यांच्या अथक परीश्रमामुळे बँकेला प्रगती साधता आली. सामाजिक बांधिलकी म्हणून बँकेने संगमनेर मधील गरजू व्यक्तींना डोळ्याचे ऑपरेशन मोफत करणाऱ्या रोटरी आय केअर यांना 7,50,000/- रु चे अद्यावत डोळे तपासणी यंत्र सस्नेह भेट दिले आहे. तसेच समाजातील नवतरुणांच्या कला गुणांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी बँकेचे अध्यक्ष आद्य प्रवर्तक “स्व.ओमकारनाथजी मालपाणी” यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रेरणा दिन कार्यक्रमात संगमनेर महाविद्यालयाच्या 350 विद्यार्थ्यांना त्यांची कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

सभासदांना आर्थिक पत्रके बनवण्याची शिस्त लागावी,त्यांना RBI कडून येणारे नवनवीन नियम/सर्क्युलर कळावे व आपल्या सभासदांना /ग्राहकांना आर्थिक शिस्त लागावी ,त्यांनी व्यवहार करत असताना डॉक्युमेंटेशन व सर्व बाबी व्यवस्थित कश्या पाळाव्यात तसेच सध्या चालू असलेल्या आर्थिक घोटामोडीचे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावे यासाठी बँकेचे माजी चेअरमन ,जेष्ठ संचालक व उद्योगपती राजेश मालपाणी यांनी बँकेच्या 100 मोठ्या ग्राहकांसाठी प्रशिक्षण घेतले. या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद व प्रतिक्रिया मिळाल्या. संचालक स्टाफ व ग्राहक अश्या तिहेरी स्तरावर जेष्ठ संचालक राजेश मालपाणी याचे मोलाचे मार्गदर्शन बँकेला सतत मिळत असते. आज बँकने केलेली हि प्रगती त्याचाच परिपाक आहे असे म्हणावे लागेल.


तसेच कर्मचारी हे दैनंदिन बदलणाऱ्या बँकिंग व्यवस्थे मध्ये अद्यावत राहावे यासाठी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां मार्फत बँक कर्मचाऱ्यांना वारंवार अंतर्गत ट्रेनिंग देण्यात येते. “ग्रीन
एनर्जी” ला चालना मिळावी व देश सेवेत आपलाही खारीचा वाट असावा या साठी बँकेच्या 3 शाखा व प्रधान कार्यालयामध्ये सौर ऊर्जेचा वापर केला आहे तसेच ग्राहकांना अत्यल्प दरात
“सौर उर्जा” निर्मितीसाठी सोलर कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच मोफत मोबाइल द्वारे RTGS/NEFT सुविधा सुद्धा ग्राहकासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. भविष्यात
दरवर्षी एक नवीन शाखा सुरु करून बँकिग व्यवसाय वाढविण्याचा मनोदय संचालक मंडळाने व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख