राजस्थानी समाज महिलांचा गणगौर उत्सव उत्साहात शेकडोंच्या संख्येने मिरवणूक

सोळा दिवस भक्तीभावाने पूजा

संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर शहरामध्ये राजस्थानी समाजातील महिला गेल्या अनेक वर्षांपासून अनोेख्या पध्दतीने गणगौर उत्सवाचे आयोजन करतात. याहीवर्षी अतिशय उत्साहाने गणगौर उत्सवाचे आयोजन संगमनेर शहरामध्ये करण्यात आले. सोळा दिवस अतिशय भक्तीभावाने देवीची पूजा केली जाते. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून गणगौर उत्सवाला सुरूवात होते. ज्या मुलींचे नुकतेच लग्न झाले आहे अशा मुली आणि सूना मोठ्या संख्येने सकाळी या मिरवणूकीत सहभागी होतात. या मिरवणूकीला धीराणी असे म्हटले जाते. या अनोख्या प्रथेचे आयोजन फक्त संगमनेरमध्ये केले जाते. त्यामुळे संगमनेरला छोटे राजस्थान म्हणून संबोधले जाते. रोज सप्तमी पासून संध्याकाळी 6 वाजता गणगौर निघते.


पाडवा,बीज,तीज चे नंबर लकी ड्राॅ मधून काढले जातात. अतिशय धूमधडाक्यात गणगौर मिरवणूक संगमनेर मध्ये काढली जाते. 200,300 महिला या मिरवणूकीत सहभागी होतात.संगमनेर मध्ये राजस्थानी समाज मोठा असल्यामुळे व सर्वानच वाटते गणगौर घ्यावी पण वादविवाद नको म्हणून फार वर्षा पासून गणगौर डोक्यावर कोण घेणार यासाठी लकी ड्राॅ पध्दतीने निवड होते व त्यात ग्रुप ने नावे येतात.
गणगौर सणाच्या पहिल्याच दिवसापासून सहभागी महिलांची संख्या जास्त पाहिजे म्हणून शाळेतील हजेरीप्रमाणे येथेही हजेरी घेतली जाते. यावर्षी पहिल्याच दिवशी सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या २०० पर्यंत गेली. गेली १६ वर्षांपासून हा उपक्रम गणगौर सणात केला जातो व अतिशय दिमाखात गणगौर सण साजरा होत आहे. सजूनधजून आलेल्या महिला आणि डोक्यावर घेतलेली गौर याचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. शेवटच्या दिवशी सहभागी होणाऱ्या महिलांमधून रोज हजर असणाऱ्या महिलांन मधून लकी ड्राॅ नंबर काढले जातात आणि या महिलांना गिफ्टचे वाटप करण्यात येते. गणगौर उत्साहामुळे संपूर्ण संगमनेर शहरामध्ये उत्साहाचे वातावरण यावेळी बघायला मिळाले.

गणगौर किंवा गौरी तृतीया हा हिंदू धर्माचा एक सण आहे ज्यामध्ये देवी पार्वती आणि भगवान शिव यांचे दिव्य प्रेम साजरे केले जाते. गौर माता हे भगवान शिवाची पत्नी पार्वतीचे रूप आहे.
असे मानले जाते की गणगौरची पूजा केल्याने विवाहित मुली सुखी राहतात आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढते. तर अविवाहित महिलांना चांगला जीवनसाथी मिळतो. गणगौर पूजेमध्ये कथेला विशेष महत्त्व आहे. याशिवाय पूजा अपूर्ण आहे.

गांगौर व्रत कथा (गांगौर व्रत कथा)

गणगौर तीजला सौभाग्य तृतीया असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान शिव आणि देवी पार्वती पृथ्वीला भेट देण्यासाठी आले. तो दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया होता. शिवपार्वतीच्या आगमनाची बातमी समजताच गावातील काही गरीब महिला पाणी, फुले, फळे घेऊन त्यांची सेवा करण्यासाठी पोहोचल्या.

अशा प्रकारे गरीब महिलांना मधाच्या रसाचे वाटप करण्यात आले.
त्या गरीब स्त्रियांची सेवा आणि भक्ती पाहून देवी पार्वती आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यावेळी देवी पार्वतीने हातात जल घेऊन त्या गरीब स्त्रियांवर लग्नाचे अमृत शिंपडले आणि तुम्हा सर्वांचे लग्न चिरंतन राहील असे सांगितले. त्यानंतर काही सधन आणि श्रीमंत घराण्यातील स्त्रिया शिव-शक्तीची सेवा करण्यासाठी पदार्थांनी भरलेल्या गटासह आल्या. भगवान शिव आईला म्हणाले, तू सर्व अमृत गरीब स्त्रियांमध्ये वाटून टाकलेस, आता त्यांना काय देणार?

माझ्या रक्ताने लग्नाचा आशीर्वाद दिला
देवी पार्वती म्हणाली की मी त्यांना माझ्यासारखेच सौभाग्य देईल. यानंतर देवी पार्वतीने आपले एक बोट कापले आणि तिच्या रक्ताचे काही थेंब श्रीमंत स्त्रियांवर शिंपडले. या अंतर्गत माता पार्वतीने श्रीमंत आणि गरीब महिलांमध्ये सुहाग वाटप केले होते. यानंतर देवी पार्वतीने नदीच्या काठावरील वाळूच्या ढिगाऱ्यातून शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली.
शिवलिंगातून महादेव प्रकट झाले आणि त्यांनी माता पार्वतीला सांगितले की, चैत्र शुक्ल तृतीयेच्या दिवशी जी विवाहित स्त्री शिव आणि गौरीची पूजा करेल, तिचा शाश्वत विवाह होईल. त्यांच्या पतींना दीर्घायुष्य लाभेल आणि कुमारी स्त्रियांना योग्य जीवनसाथी मिळेल. तेव्हापासून गणगौर पूजन सुरू झाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख