टोल कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

टोल कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन


युवावार्ता (प्रतिनिधी)

संगमनेर – टोल प्लाझा वरील कर्मचार्‍यांच्या प्रलंबीत मागण्यांबाबत Elsamex Maintenance service Ltd. या कंपनीकडे वारंवार मागणी करूनही कर्मचार्‍यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने अखेर टोल प्लाझा कामगार वेल्फेअर असोसीएशन हिवरगाव पावसा येथील कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.


टोल प्लाझा कामगारांसाठी ही संघटना कार्यरत असून या संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या हितासाठी लढा दिला जात आहे. 2018 पासून येथील कर्मचार्‍यांच्या अनेक मागण्या प्रलंबीत आहे. 1 मार्च रोजी या कामगारांच्यावतीने Elsamex Maintenance service Ltd. या कंपनीकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. 10 मार्च पर्यंत मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन देऊनही त्याची पुर्तता झाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा इशारा देत निवेदन देण्यात आले. मात्र मागण्या मान्य न झाल्याने अखेर हिवरगाव पावसा येथील टोल प्लाझा कर्मचार्‍यांनी मंगळवार दि. 14 मार्च पासून कामबंद आदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत लढा देण्याचा इशारा संघटनेचे विजय खामकर, संतोष पोखरकर, किसन वाळे, बाळासाहेब ढगे, तुषार पावसे, विवेक वाळे, पांडूरंग वाळे, किशोर पराड, विठ्ठल पाचकर, बाळासाहेब राहणे, खंडेराव दिवटे, शिवाजी फड आदिंनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख