तांबे-थोरात कुटुंबाला त्रास देण्यासाठी पक्षातील नेत्यांची ही स्क्रिप्टेड स्टोरी – सत्यजित तांबेनी अखेर केला खुलासा; मी कॉंग्रेसचाच परंतु अपक्ष म्हणून काम करणार – आ. सत्यजित तांबे

0
1907

दैनिक युवावार्ता
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक काळात दिल्लीतील नेतृत्त्‍व आमच्याशी चर्चा करत होते. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमच्या विरोधात बोलत होते. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्याचे षड्यंत्र रचण्यात आले; परंतु मी भविष्यात अपक्ष राहणार असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचेही मार्गदर्शन घेऊन काम करत राहणार आहे, मी काँग्रेस सोडलेली नाही, असे नूतन आमदार सत्यजित तांबे यांनी आज (दि. ४) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.


तांबे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी, कटकारस्थान रचण्यात आले. माझा कुटुंबावर आरोप करणे, हे स्क्रिप्टेड षड्यंत्र होते. ही स्क्रिप्टेड स्टोरी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी रचण्यात आली, असा आरोपही तांबे यांनी यावेळी केला.
गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये निष्ठेने काम करतोय; परंतु निवडणुकीदरम्यान तांबे कुटुंबीयांवर अनेक आरोप करण्यात आले. युवक प्रदेशचा अध्यक्ष असताना काँग्रेसचे संघटनात्मक काम केले. २०३० मध्ये तांबे कुटुंबाला काँग्रेसमध्ये १०० वर्ष पूर्ण होतील. युवक काँग्रेसमध्ये काम करताना ५० केसेस असलेला एकमेव मी आहे; परंतु वडील आमदार असल्याने तुम्हाला संधी देता येणार नाही, असे काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितले. काँग्रेसची परिस्थिती वाईट असताना काम केले. पक्षश्रेष्ठींकडे जेव्हा काही मागितले, तेव्हा संधी देण्यात आली नाही, असेही तांबे यांनी यावेळी नमूद केले

माझ्या कुटुंबाला, आमदार बाळासाहेब थोरात साहेबांना अडचणीत आणण्यासाठी हे स्क्रिप्टड षडयंत्र आहे- मला पक्षातून दूर करण्यासाठी हे षडयंत्र आहे. मी काँग्रेसचाच आहे पण मी लोकहितासाठी अपक्षच राहणार-
– आमदार सत्यजित तांबे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here