हा सत्यजित तुमच्या प्रत्येक कठीण प्रसंगात सोबत – तांबे

सत्यजित तांबेझंजावाती प्रचार दौऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

युवावार्ता (प्रतिनिधी)

राज्यात जुन्या पेन्शन योजनेसह शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदानीचे प्रश्न, कंत्राटी पद्धती, नवीन नोकरी भरती असे अनेक प्रलंबित प्रश्न बाकी आहेत .हे सर्व प्रश्न आव्हान म्हणून प्राधान्याने सोडवणार असून हा सत्यजित तुमच्या प्रत्येक कठीण प्रसंगात सोबत असेल असा ठाम विश्वास युवा उमेदवार सत्यजित तांबे यांनी केले आहे.अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर संगमनेर राहता राहुरी येथील नागरिकांशी संवाद साधताना सत्यजित तांबे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यात विविध खात्यांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत. परंतु सरकार नवीन नोकर भरती करण्यासाठी उदासीन आहे.

यात सर्वात महत्त्वाची म्हणजे जिल्हा परिषद व माध्यमिक शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत .याचा थेट परिणाम राज्यातील गुणवत्तेवर होत आहे. गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध विषयांच्या करिता स्वतंत्र शिक्षकांसह नव्याने भरती होणे गरजेचे आहे. अनेक पात्र उमेदवार प्रतीक्षेत आहेत. मात्र त्यांना नोकरीची संधी मिळत नाही.राज्याच्या  विविध विभागात असलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत तसेच शिक्षण व आरोग्य हे शासनाने मोफत व गुणवत्तेचे सर्वांना पुरवले पाहिजे शासनाचा जीडीपीनुसार सात टक्के खर्च शिक्षणावर होणे अपेक्षित आहे मात्र सध्या तो फक्त अडीच टक्केच होत आहे यामुळे गुणवत्ता ढासळत आहे.

कृषी व्यवसायात नवीन संधी निर्माण करताना शेतीला व्यवसाय म्हणून नवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या तरुणांचा ओढा त्याकडे निर्माण होईल याचबरोबर पिकांसाठी हमीभाव अद्याप ठरलेला नाही .तो हमीभाव निश्चित करण्यासाठीही आपण पाठपुरावा करणार आहोत..

प्रचार सभांना उस्फूर्त प्रतिसाद

अमोघ वकृत्व लाभलेले सत्यजित  तांबे यांचे विविध विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी, प्रश्नांची सोडवणूक करण्याची पद्धत, याचबरोबर प्रत्येकाशी जिव्हाळ्याचा थेट संबंध यामुळे पाचही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सत्यजित तांबे यांच्या प्रचार दौऱ्यांना पदवीधरांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे..

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख