संगमनेर शहर परिसरातून दाेन दुचाकी चाेरीला
नागरीक त्रस्त
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरात पोलीसांच्या नाकावर टिचून चोरटे दिवसा ढवळ्या नागरीकांचे वाहने चोरी करत आहे. घरफोडी, चैन स्कॅचिंग हे प्रकार तर नित्याचे आहे. मंगळवारी 5 डिसेंबर रोजी देखील सकाळी 9 ते 9.30 च्या दरम्यान शहर बसस्थानकातून मार्केटिंगचा व्यवसाय करणार्या एका तरूणाची दुचाकी चोरून नेली. तर शहरातील नेहरू चौकातून भल्या पहाटे चोरट्यांनी एक दुचाकीची चोरी केली. दुचाकी चोरीचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून शहरात प्रचंड वाढलेले असतांना पोलीसांना वाहन चोर सापडत नसल्याने अश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहरातील नेहरू चौक, गणपुले वाड्यासमोरील अंगणात लावलेली अनुराघ दत्तात्रय काळे यांच्या मालकीची होंडा कंपनीची सफेद रंगाची अॅक्टीव्हा 6 जी स्कुटी एमएच 17 सीटी 8501 ही लावलेली असतांना अज्ञात चोरट्यांनी 3 डिसेंंबर ते 3 डिसेंबर पहाटे 5 वाजेच्या दरम्यान चोरून नेली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच मंगळवार दि. 5 रोजी मार्केटिंग व्यावसाय करणारे शाकीर मेहबूब शेख (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) या तरूणाने बसस्थानकावरील अकोले रोडकडील गेट समोर आपली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस एमएच 17 एडी 9600 ही दुचाकी उभी करून बसस्थानकात गेला असता अज्ञात चोरट्यांनी त्याची दुचाकी चोरून नेली. याप्रकणी देखील पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोरीचे गुन्हा दाखल होत असले तरी तपास लावला जात नाही. त्यामुळे रोज शहरातून दुचाकी चोरीला जात आहे. अनेकवेळा तर नागरीक तक्रारही करत नाही अशी परिस्थीती निर्माण झाली आहे.