तब्बल सात तास चालणारी शस्त्रक्रिया वाघोलीकर हॉस्पिटलमध्ये यशस्वी

0
1645

रुग्णाचे खराब झालेले मूत्राशय काढून,आतड्या पासून नवीन मूत्राशय बनवले

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – एक 50 वर्षीय गृहस्थ लघवीच्या त्रासामुळे गेले एक दशक अत्यंत त्रस्त होते. साधारणपणे कोणताही सामान्य व्यक्ती एका वेळेस 300 ते 500 मिली पर्यंत लघवी स्वताच्या मूत्राशयामध्ये साठवून ठेऊ शकतो. सदर रुग्णाच्या मूत्राशयाची लघवी साठवण्याची क्षमता अतिशय कमी होऊन फक्त 50 मिली इतकीच राहिली होती. यामुळे त्यांना दर 15 ते 20 मिनिटानी लघवीला जावे लागे. मग ते दिवस असो वा रात्र ! यामुळे होणार्‍या वारंवार लघवीच्या इन्फेक्शनमुळे त्यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली होती. ही तक्रार घेऊन रुग्ण व इतर नातेवाईक संगमनेर येथील डॉ. ऋषिकेश वाघोलीकर यांना भेटले. मात्र गोळ्या औषध देऊन पण काहीच फरक पडेना. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना र्रीसाशपींरींळेप लूीीेंश्रिरीीूं (ऑगमेंटेशन सिस्टोप्लास्टी) ही शस्त्रक्रिया सुचवली. या शस्त्रक्रियेमध्ये पेशंटच्या लहान आतड्यांचा 30 सेमी लांबीचा एक तुकडा वेगळा केला जातो अणि त्यापासून गोलाकार नवीन मूत्राशय बनवला जातो. हे आतड्यांपासून बनवलेले नवीन मूत्राशय जुन्या मुळ मूत्राशयाला जोडले जाते. यामुळे मूत्राशयाच्या पिशवीची लघवी साठवण्याची क्षमता वाढते. हे करत असताना नवीन अणि जुन्या मूत्राशयाचा रक्तपुरवठा व्यवस्थित राहील याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे शस्त्रक्रियेची प्रत्येक स्टेप खूप महत्त्वाची ठरते. अशी ही किचकट शस्त्रक्रिया संगमनेर येथील वाघोलीकर किडनी हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पडली. ही शस्त्रक्रिया तब्बल सात तास चालली. एवढ्या लांबलचक शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला व्यवस्थितपणे भूल देऊन, रुग्णाला काहीही त्रास होऊ न देता शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात भूलतज्ञ डॉ. रसिका वाघोलीकर यांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची होती. शस्त्रक्रिये नंतर पुढील ट्रीटमेंट फार महत्त्वाची होती. आतड्यांची आतील जखम भरून येण्यासाठी शस्त्रक्रियेनंतर पुढील 3 दिवस रुग्णाला उपाशी ठेवायचे होते. या कालावधीत सलाईनद्वारे शरीराच्या सर्व गरजा पूर्ण केल्या गेल्या. रुग्णाचे मॉनिटरिंग एकदम काटेकोरपणे केले गेले. या काळात हॉस्पिटल स्टाफने घेतलेल्या अथक प्रयत्नांमुळे रुग्णाची रिकव्हरी पण वेगात झाली व अवघ्या आठ दिवसांत रुग्णाला डिस्चार्ज करता आले.
ही शस्त्रक्रिया अतिशय किचकट व लांबलचक होती. अशा पद्धतीची दुर्मिळ व मोठी शस्त्रक्रिया प्रथमच संगमनेर तालुक्यात झाली असावी. यामुळे डॉ. श्री. व सौ. वाघोलीकर तसेच वाघोलीकर किडनी हॉस्पिटल चे सर्व स्टाफ यांचे जितके कौतुक करावे तितके कमीच अशी भावना रुग्ण व नातेवाईकांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here