संगमनेर तालुका सह दूध संघास राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार

मुंबई येथे राजहंस दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी स्वीकारला पुरस्कार

राजहंस दूध संघामुळे तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत

संगमनेर (प्रतिनिधी) काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघास राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट सहकारी दूध संघ म्हणून गौरविण्यात आले आहे.

मुंबई येथे एन बी समूहाच्या वतीने राज्यस्तरीय सहकार क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट सहकारी दूध संघाचा पुरस्कार सहकार मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील, विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये राजहंस दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी स्वीकारला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर राजहंस दूध संघाची वाटचाल सुरू असून या दूध संघामुळे तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राजहंस दूध संघाने  गाईंचे आरोग्य साठी विविध उपक्रम राबवले असून मुरघास योजना, एमडीएफ गोठा, गाईंसाठी कर्ज सुविधा असे नवनवीन उपक्रम राबवले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना या व्यवसायात मोठी मदत झाली आहे.

संगमनेर तालुक्यातून दररोज साधारण सात लाख लिटर दूध निर्मिती होत असून यामुळे तालुक्यातील अनेक कुटुंबांची आर्थिक प्रगती झाली आहे. या सर्व वाटचालीत सहकारातून समृद्धी निर्माण करणाऱ्या राजहंस दूध संघाला राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

या पुरस्कारानंतर रणजितसिंह देशमुख म्हणाले की, हा पुरस्कार सांघिक कामाचा असून शेतकरी, दूध उत्पादक ,कामगार, दूध विक्रेते ,ग्राहक या सर्वांच्या प्रयत्नातून दूध व्यवसायातून मोठी आर्थिक क्रांती झाली आहे. या पुरस्काराने काम करण्याची आणखी बळ मिळणार असल्याचेही ते म्हणाले.

दूध संघाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे ,बाजीराव पा खेमनर , ॲड माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, बाबा ओहोळ, सुधाकर जोशी, कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, शंकरराव पा खेमनर, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे..

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख