जिल्ह्यातील प्रभारी पोलीस राज संपुष्टात

पोलीस दलात मोठे फेरबदल

भगवान मथुरे शहर, देविदास ढुमणे तालुका, संतोष खेडकर घारगावमध्ये

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनरे –
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमधील प्रभारी राज संपुष्टात आणत जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. अहमदनगर जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर जिल्ह्यात अधिकार्‍यांना नव्या नियुक्त्या दिल्या आहेत. अनेक वादग्रस्त आणि काम न करणार्‍या अधिकार्‍यांची उचल बांगडी झाल्याने त्यांच्या रिक्त जागांवर आता नवे पोलीस अधिकारी काम करणार आहेत. जिल्ह्यात नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षकांना नियुक्त देण्यात आल्या आहे.

यात संगमनेर तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. त्यामुळे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भगवान हरिभाऊ मथुरे, तालुका पोलीस ठाण्यात देविदास किसन ढुमणे, घारगाव पोलीस ठाण्यात संतोष बाबुराव खेडकर तर आश्‍वी पोलीस ठाण्यासाठी संतोष नारायण भंडारी या पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे.


मध्यावधी, प्रशासकीय, विनंती आणि नव्याने नेमणुका करण्यासंदर्भातील बदल्यांचा यात समावेश आहे. अधीक्षक पोलीस दलात फेरबदल कधी करणार? याची उत्सुकता होती. अखेरीस मंगळवारी रात्री त्यांनी ही उत्सुकता संपुष्टात आणली. संगमनेर शहर व संपूर्ण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. शहराचे प्रभारी राजेंद्र भोसले यांना बदली होती. तर घारगावचे पाटील यांची बदली झाली होती. त्याच बरोबर तालुका आणि आश्‍वी पोलीस ठाण्यातही प्रभारी राज होते. अखेर आज तालुक्यातील चारही पोलीस ठाण्याला नविन पोलीस निरीक्षक मिळाले असल्याने तालुक्याची कायदा व सुव्यवस्था पुर्ववत होईल अशी आशा संगमनेरकरांना आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख