न्यायालयासह प्रशासकीय इमारतींची दुर्दशा, प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा उपोषण – उकिर्डे

प्रशासकीय इमारतींची दुर्दशा

संगमनेर (प्रतिनिधी)

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून व दिर्घ नियोजनातून संगमनेरात भव्यदिव्य अशा प्रशासकीय इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे जनतेच्या कामांना व प्रशासकीय कामांना वेग आला. परंतु या भव्य दिव्य इमारतींची अल्पावधीतच मोठी दुर्दशा झाली. येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय, (प्रशासकीय भवन) तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयसह नवीन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आज समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. या कार्यालयात नागरीकांना सुविधा तर मिळत नाहीत उलट ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे.


ठिकठिकाणी गुटखा, पान सुपारी, तंबाखू च्या पिचकार्‍यांनी या कार्यालयाच्या भिंती रंगल्या आहेत. कचर्‍याचे ढीग तसेच शौचालयात पुरेसे पाणी नाही, पिण्यासाठीही पाणी नाही अशा अवस्थेत या नवीन इमारतीत प्रशासकीय कामकाज चालू आहे. त्यामुळे तेथील कर्मचार्‍यांसह नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाने याची नोंद घेऊन तातडीने उपाययोजना न केल्यास न्यायालयाच्या इमारतीबाहेर उपोषण सुरु करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे यांनी दिला आहे.


माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या मंत्री पदाच्या माध्यमातून शहर व तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये आणले. त्यातून शहरात अनेक भव्य दिव्य अशा प्रशासकीय इमारती उभ्या राहिल्या. यात जिल्ह्यात कुठे नसणारी इतकी सुंदर जिल्हा सत्र न्यायालययाची इमारत घुलेवाडी येथे उभी राहिली. मात्र केवळ प्रशासकीय नियोजन नसल्याने अल्पावधीतच या इमारतीची दुरावस्था होऊ लागली आहे. येथे येणार्‍या अभियुक्तांसाठी पिण्याचे पाणी, तसेच शौचालयात पुरेसे पाणी नाही. रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्यांचा खच, ठिकठिकाणी थुंकल्यामुळे रंगलेल्या भिंती, तुटलेले नळ, साचलेली धूळ यामुळे बाहेरून सुंदर दिसणारी हि इमारत आतून पोखरू लागली आहे. ज्यांच्याकडे या इमारतीची देखभाल आहे त्यांचे या समस्येकडे दुर्लक्ष आहे तर बार असोसिएशनचे पदाधिकारी याबाबत गंभीर नाही. अनेक वेळा या ठिकाणी पाणीपुरवठा वेळेवर होत नाही. स्वच्छताही वेळेवर केली जात नाही. येणार्‍या नागरीकांना नाक मुठीत धरून या इमारतीत वावरावे लागते. ज्या ठिकाणी न्याय दिला जातो. त्याच ठिकाणी मात्र स्वच्छतेबाबत न्याय मागण्याची वेळ या इमारतीवर आली आहे.


न्यायालयीन इमारती बरोबरच शहरातील अनेक इमरतींची अशाच प्रकारची दुर्दशा झाली आहे. स्थानिक अधिकार्‍याची कॅबीन स्वच्छ असल्याने त्यांचेही या समस्येकडे दुर्लक्ष होते. मात्र येथील कर्मचारी, येणारे नागरीक यांना मात्र त्याचा त्रास होतो. प्रशासनाने त्याची त्वरीत दखल घ्यावी अन्यथा उपोषण करू असा इशार उकीर्डे यांनी दिला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख