छत्रपती शिवरायांच्या विश्रांतीमुळे पावन झालेला पट्टा किल्ला… म्हणजेच विश्रामगड

छत्रपती शिवराय यांचे पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणून येथे दरवर्षी २२ नोव्हेंबर हा दिवस पदस्पर्श दिन म्हणून साजरी केला जातो. या वर्षी मराठा आरक्षणासाठी कार्य करणारे मराठा योध्या मनोज जरांगे पाटील हे छत्रपती शिवराय यांना अभिवादन करण्यासाठी येत आहे. त्या निमित्ताने पट्टा किल्ल्याचे महत्व सांगणारा लेख ….

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला असा अकोले तालुक्यातील महत्वाचा दुर्ग म्हणजे पट्टाकिल्ला होय. निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या अकोले तालुक्यामधील बहुसंख्य अशा प्रेक्षणीय ठिकाणांपैकी एक , शेती भाती मधून प्रवास करत आणि अतिशय रमणीय असा वळणदार घाटरस्ता पार करत आपण पोहोचतो ते गडाच्या पायथ्याशी असलेल्या पट्टेवाडी गावात. आजूबाजूच्या पर्वतरांगा शी स्पर्धा करत समोरच दर्शन देतो तो किल्याचा अजस्त्र डोंगर.. गडाच्या दर्शनाने आणि आल्हाददायक स्वच्छ हवेने आपला कितीही लांबच्या प्रवासाचा थकवा क्षणात नाहीसा होतो.तिथेच आपल्या स्वागताला उभे असते ते किल्याचे प्रवेशद्वार, सोपी चढाई, हिरवीगार वृक्षराजी, मोठे बुरुज, भक्कम तटबंद्या आणि गडावरचा प्रशस्त प्रासाद आपल्याला अलगद शिवकाळात घेऊन जातो. गडाच्या माथ्यावर पोहोचतात महाराजांचा अर्धाकृती पुतळा आणि मेघडंबरीसमोर आपण नकळत नतमस्तक होतो.
इ.स. १६७९ मध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात महाराजांनी जालन्याची तेव्हाचे जालनापूर ची लूट केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जलनापुरात मोगलांवर चालून गेले. सोने नाणे, जडजवाहीर घेऊन महाराज रायगडाकडे निघाले. दरम्यान, ही खबर मुघल सरदार रणमस्तखानाला लागली. जालण्याची प्रचंड लूट झाली. तो दहा हजारांची मोठी फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला. लूट जास्त असल्यामुळे राजांच्या फौजेची गती संथ होती. मोगली फौजेने स्वराज्य सेनेवर आक्रमण केलं.


संगमनेर जवळ रायतेवाडी येथे दोन्ही सैन्याची गाठ पडली. दि. १८, १९ व २० नोव्हेंबर असे ३ दिवस दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. खानाच्या दिमतीला औरंगाबादेहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर आली. छत्रपती शिवाजी महाराज, सेनापती हंबीरराव मोहिते, धनाजी जाधव आघाडीवर होते, पण मोगलांचा जोर पाहता हंबीरराव ह्यांनी महाराजांना मागे घेऊन काही फौजेसह पट्टागड जवळ करण्यास सांगितले आणि स्वतः मोगली आक्रमण थोपवू लागले. युद्ध सुरू असतानाच महाराजांनी खजिना घेऊन पुढे जायचे व बाकीच्या सैन्याने लढाई सुरू ठेवायची, अशी रणनीती निश्चित करण्यात आली. निवडक ५०० घोडेस्वारांसह महाराज पट्टाकिल्ल्या कडे रवाना झाले. संगमनेरजवळ रायतेवाडी येथे आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून छत्रपती शिवाजी महाराज २१ नोव्हेंबर इ.स. १६७९ या दिवशी नगर-नाशिक जिल्ह्यांच्या हद्दीवर असणाऱ्या अकोले तालुक्यातील पट्टा किल्ल्यावर आले. त्यांचे वास्तव्य १७ दिवस या किल्ल्यावर होते. ते विश्रांतीसाठी थांबले म्हणून या किल्ल्याचे नाव ‘विश्रामगड’ असे पडले. ह्यानंतर महाराज संभाजी राजांना पन्हाळगडी भेटण्यास गेले. दोघांमध्ये गुप्त चर्चा झाली आणि महाराज रायगडी निघाले. विश्रांती घेऊन पुढे कल्याणमार्गे रायगडावर पोहोचले. म्हणजे दक्षिण दिग्विजयाची सांगता होता होता “जालण्याची लूट” करताना झालेली लढाई ही महाराजांची शेवटची लढा.जालानापूरची लूट केल्यानंतर शिवाजी महाराजांनी काही काळ या किल्ल्यावर घालवला. जालन्याची स्वारी संपवून स्वराज्यात परतताना महाराज विश्रांतीसाठी थांबले ते याच किल्यावर. चालून आलेल्या रणमस्तखानाविरुद्ध महाराज लढले ते याच किल्याच्या प्रदेशात. मोगलांकडून गड घेताना शूर मावळा-गुप्तहेर बहिर्जी नाईक यांनी गनिमी कावा खेळला तो इथल्याच जंगलात.
इ.स. १६७१ मध्ये पट्टा हा किल्ला मोरो त्र्यंबक पिंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरिता जिंकला व स्वराज्यात सामील झाला. पट्टागड शिवाजी महाराजांनी जिकूंन घेतला. पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक मोठे पठारच आहे येथून अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई, त्रिंबकगड हा सर्व परिसर नजरेत भरतो या सर्व परिसरावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होत असे शिवरायांनी हा किल्ला जिंकला.
१६८२ साली औरंगजेबाने महाराष्ट्रात पदार्पण केले आणि मराठी मुलूख ताब्यात घेण्यास सुरवात केली. १६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरवात केली होती पट्टागडा संबंधी मातबरखान औरंगजेबाकडे अर्ज पाठवतो त्यात तो म्हणतो. “सेवकाने काही दिवसांपासून १००० कोळी, भिल्ल, व मावळे यांचे पथक सैन्यात घेतले आहे मराठ्यांच्या ताब्यात असलेले पट्टा व इतर किल्ल्यालगतच्या जमीनदारांना रकमा पुरवण्यात आल्या आहेत ११ जानेवारी १६८८ ला खानाने काही पथके किल्ला घेण्याच्या मार्गावर धाडली मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग याची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. पट्टागड त्यांना जिंकून घेतला. इ.स १६८६ पर्यंत हा सर्व परिसर मराठांच्या ताब्यात होता


सह्याद्रीचे वर्णन करताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात की,
“पौरूषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्रि. त्याच्या आवडीनिवडी आणी खोडी पुरूषी आहेत. त्याचे खेळणे-खिदळणेही पुरूषी आहे. कारण सह्याद्रि हा ज्वालामुखीचा उद्रेक आहे. अतिप्रचंड, अतिराकट, अतिदणकट अन् काळाकभिन्न.”
स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत विश्रामगड आजही दिमाखात उभा आहे. किल्याच्या भोवतालचा निसर्गसमृद्ध परिसर आपल्याला भुरळ पडल्याशिवाय रहात नाही.सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात थळघाटाच्या पूर्वेकडे जाते याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढ, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत अलंग, मदन, कुलंग येथे असणारे घनदाट जंगल, दुर्गमवाटा यामुळे येथील किल्ल्यांची भटकंती फारच अवघड आहे तर औंढ, पट्टा, या परिसरातील भ्रमंती फारच सोपी आहे पट्टावाडीतून पायर्यांच्या वाटेने वर आल्यावर दोन गुहा लागतात. एक गुहा सध्या कुलुप लावून बंद केलेली आहे. दुसऱ्या गुहेत राहाता येते. या गुहेच्या पुढेही काही गुहा आहेत, पण वापरात नसल्याने त्र्यांधची अवस्था वाईट आहे. या गुहां जवळून जाणार्याक पायर्यां च्या वाटेने वर चढतांना दोनही बाजूचा कातळ छिन्नी हातोड्याने तासून गुळगुळीत केलेला दिसतो. मधे तटबंदीचे अवशेष दिसतात. पायर्यां चढून वर गेल्यावर उजवीकडे उत्तरमुखी प्रवेशव्दार दिसते. त्याची कमान आजही शाबूत आहे. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला बुरूज आहे. येथून एक वाट पट्टावाडीत उतरते. प्रवेशव्दार पाहून परत वरच्या दिशेने जातांना कातळात खोदलेल्या पायर्याज लागतात. येथे एक सातवाहन कालीन पाण्याचे टाके आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यापासून वर चढत गेल्यावर अष्टभुजा देवीचे मंदिर लागते या मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्वार केला आहे. मंदिरा समोरून उजव्या बाजूने वर चढत गेल्यावर आपण एका प्रशस्त इमारतीपाशी येतो. या इमारतीला “अंबरखाना” म्हणतात. या इमारतीची बांधणी काळ्या घडीव दगडात केलेली असून आत प्रशस्त दालन आहेत. इमारतीचे छ्त घुमटाकार आहे. येथून वरच्या दिशेने चढत गेल्यावर आपण किल्ल्याच्या माथ्यावर येतो. पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. माथ्यावरून दूरवर औंढा किल्ल्याचा सूळका दिसतो. या पठारावर उजव्या बाजूला ( औंढा किल्ल्याच्या दिशेला) गेल्यावर प्रथम पाण्याची दोन मोठी टाकी लागतात. त्याच्या पुढे काही गुहा लागतात. गुहांच्या पुढे गेल्यावर ओळीत खोदलेली पाण्याची टाकी लागतात, “बारा टाकी” म्हणून ओळखतात. येथून सरळ जाणाऱ्या वाटेने औंढा किल्ल्यावर जाता येते. बारा टाकी पासून परत फिरुन परत येतांना थोडे खालच्या बाजूस उतरून आल्यास अजून काही पाण्याची टाकी पाहायला मिळतात.
पट्टाकिल्ला वर शिवसृष्टी उभारली असून येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धपुतळा व मेघडंबरी बनवली आहे.
संकलन:-
श्री. भाऊसाहेब वाकचौरे पाटील
जिल्हा सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा महासंघ, नगर जिल्हा

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख